India playing XI vs ENG, 2nd ODI: इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11

India playing XI vs ENG, 2nd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज दुसरा वनडे सामना होणार आहे. ओव्हलमध्ये पहिल्या वनडेत इंग्लिश संघाला भारताने धूळ चारली.

India playing XI vs ENG, 2nd ODI: इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 11:40 AM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज दुसरा वनडे सामना होणार आहे. ओव्हलमध्ये पहिल्या वनडेत इंग्लिश संघाला भारताने धूळ चारली. आज लॉर्ड्स (Lords) वर दुसरा सामना होणार आहे. भारतीय संघ आज मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पहिल्या मॅच प्रमाणे दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवणं भारतासाठी सोपं नसेल. कारण इंग्लंडच्या संघात पलटवार करण्याची क्षमता आहे. ज्यो रुट, (Joe Root) जॉनी बेयरस्टो, जोस बटलर हे त्यांचे दिग्गज खेळाडू दमदार प्रदर्शनासाठी आतुर असतील. भारतीय संघही चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आजचा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. टीम इंडिया दुसऱ्या वनडे साठी प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का?, विराट कोहली दुसऱ्या सामन्यात खेळणार? हे प्रश्न आहेत.

विराट कोहलीच्या बाबतीत धोका नाही पत्करणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली दुसऱ्या वनडेत खेळणार नाही. ग्रोइन इंजरीचा सामना करणारा विराट पहिल्या वनडेही खेळला नव्हता. अजून तो दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. 100 टक्के फिट झाल्याशिवाय विराट मैदानात उतरला, तर त्याची दुखापत आणखी बळावू शकते. अशावेळी विराटच्या बाबतीत टीम इंडिया धोका पत्करणार नाही. टीम इंडिया कुठल्याही बदलाशिवाय लॉर्ड्सच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

ओव्हलचीच टीम लॉर्ड्सवर कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. कारण ओव्हलवर रोहित शर्मा आणि शिखर धवन शिवाय दुसरा कुठलाही खेळाडू फलंदाजी करु शकला नव्हता. दोघांनी शतकी भागीदारी करुन 111 धावांचे लक्ष्य 18.3 षटकात पार केले होते.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

भारतीय संघ – रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.