IND vs WI Predicted Side 1st T20: वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 साठी अशी असू शकते भारताची प्लेइंग XI
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेत मिळवलेलं यश कायम टिकवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
कोलकाता: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेत मिळवलेलं यश कायम टिकवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारताने क्लीन स्वीप करत वनडे सीरीजमध्ये 3-0 असा विजय मिळवला. नियमित कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे. आजपासून सुरु होणाऱ्या टी-20 सीरीजमधील तिन्ही सामने कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर (Eden gardens) खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये गोलंदाजी भारताचे बलस्थान ठरले होते. दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला एकदाही 300 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 176, दुसऱ्या वनडेत 193 आणि तिसऱ्या वनडेत 169 धावांवर ऑलआऊट केलं.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी भारताचे काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. केएल राहुल, अक्सर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिघेही दुखापतीमुळे टी-20 सीरीजमध्ये खेळत नाहीयत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती.
वेस्ट इंडिज विरुद्ध आज होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज
India Predicted XI vs WI 1st T20 at Eden Gardens