T20 World Cup 2023: पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या किती तारखेला होणार सामना

T20 World Cup 2023: क्रिकेट विश्वाला नेहमीच या सामन्याची उत्सुक्ता असते. कोट्यवधील क्रिकेटप्रेमींचे डोळे या सामन्याकडे लागलेले असतात.

T20 World Cup 2023: पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या किती तारखेला होणार सामना
ind vs pakImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 2:44 PM

मुंबई: चालू वर्षाप्रमाणे पुढचं वर्षही टीम इंडियासाठी खास असणार आहे. क्रिकेटप्रेमींना अनेक रंगतदार सामने पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा आहे. या वर्ल्ड कपआधी महिलांची टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. 12 फेब्रुवारीचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी विशेष असेल. या दिवशी टीम इंडिया परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. पुरुष टीमचा सामना नसला म्हणून काय झालं? समोर पाकिस्तानची टीम असली, मग सामना कुठलाही असो, भारतीयांचा जोश नेहमीच हाय असतो.

कुठे रंगणार सामना?

10 फेब्रुवारीला ICC महिला टी20 वर्ल्ड 2023 ची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच वर्ल्ड कप अभियान 12 फेब्रुवारीला सुरु होणार आहे. भारतीय टीम पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने अभियानाची सुरुवात करेल. केपटाऊनमध्ये हा सामना रंगणार आहे.

कोणाचं पारडं जड असेल?

12 फेब्रुवारीला केपटाऊनच्या पीचवर सामना रंगेल, त्यावेळी कोणाचं पारडं जड असेल?. भारत की, पाकिस्तान? क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये भारताची कामगिरी पाकिस्तानपेक्षा सरस आहे. टुर्नामेंटसाठी भारताने आपली टीम निवडली आहे. आता फक्त सामना सुरु होण्याची प्रतिक्षा आहे.

ग्रुप 2 मध्ये भारतासोबत कुठल्या टीम्स?

टीम इंडिया टुर्नामेंटच्या ग्रुप 2 मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताबरोबर इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडचे संघ देखील आहेत. म्हणजे पुढचा मार्ग सोपा नसेल. दुसऱ्या टीम्सच सुद्धा आव्हान असेल. प्रत्येक ग्रुपमधून प्रत्येकी दोन टीम्स पुढच्या फेरीत म्हणजे सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. वर्ल्ड कपआधी तिरंगी मालिका

T20 वर्ल्ड कप 2023 मध्ये उतरण्याआधी भारतीय टीम दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे. 19 जानेवारीला सुरु होणारी ही सीरीज 2 फेब्रुवारीपर्यंत चालेल. म्हणजेच हरमनप्रीत अँड कंपनीकडे चूका दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ असेल.

कधी, कुठल्या टीम विरुद्ध होणार सामना?

12 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तान विरुद्ध केपटाऊमध्ये सामना रंगेल. 15 फेब्रुवारी 2023 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केपटाऊनमध्ये सामना रंगेल. 18 फेब्रुवारी 2023 रोजी इंग्लंड विरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे सामना रंगेल. 20 फेब्रुवारी 2023 रोजी आयर्लंड विरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे सामना रंगेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.