WTC Final India Playing XI: Ajinkya Rahane प्लेइंग इलेव्हनमध्ये आल्यास पत्ता कोणाचा कट होणार?
WTC Final India Playing XI: अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीममध्ये स्थान मिळवलय. त्याच्या समावेशामुळे दुसऱ्या मोठ्या प्लेयरचा पत्ता कट होईल.
WTC Final India Playing XI : BCCI च्या सिलेक्शन कमिटीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी एका मजबूत संघाची घोषणा केली आहे. अनुभवासोबत युवा जोश असलेल्या खेळाडूंची टीममध्ये निवड झालीय. महत्वाची बाब म्हणजे या टीममध्ये अजिंक्य रहाणेला स्थान मिळालय. फ्लॉप असूनही केएल राहुलच टीममध्ये स्थान कायम आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून केएस भरतची टीममध्ये निवड झालीय. आता प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार? हा मुद्दा आहे. 15 पैकी फक्त 11 प्लेयरना मैदानात उतरण्याची संधी मिळेल.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. या मैदानाचा रेकॉर्ड आणि कंडीशन पाहता टीम इंडिया कुठली प्लेइंग 11 उतरवणार, याची उत्सुक्ता आहे. केएल राहुलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.
WTC Final मध्ये ओपनिंगला कोण येणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ओपनिंगला कोण येणार?. ओपनिंगसाठी तीन पर्याय आहेत. एका कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहुल. टीम मॅनेजमेंटला आता हे ठरवायचय की, ते ओपनिंगला कोणाला पाठवणार? राहुल की गिल?. शुभमन गिलने टेस्ट सीजनमध्ये 44.52 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 13.57 च्या सरासरीने फक्त 95 धावा केल्या आहेत. त्यामुळे ओपनिंगच्या जागेसाठी शुभमन गिल दावेदार आहे.
मिडल ऑर्डरमध्ये रहाणेच पुनरागमन
मिडल ऑडरमध्ये पुजारा, विराटची जागा पक्की होती. आता यामध्ये अजिंक्य रहाणेच्या रुपाने आणखी एक मोठा खेळाडू आलाय. रहाणेने रणजीत 11 इनिंगमध्ये 634 धावा ठोकल्यात. आयपीएल 2023 मध्ये तो 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा बनवतोय. त्यामुळेच रहाणेला पुन्हा संधी मिळालीय. रहाणे श्रेयस अय्यरच्या जागी 5 व्या नंबरवर खेळताना दिसेल. विकेटकीपर कोण? भरत की राहुल?
टीम इंडियाने केएल राहुलला ओपनर म्हणून संधी दिली नाही, तर विकेटकीपर म्हणून त्याला संधी मिळू शकते. केएस भरतची विकेटकीपर म्हणून टीममध्ये निवड झालीय. केएस भरतला WTC Final मध्ये खेळवणार का? हा मोठा प्रश्न आहे. भरत पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळणार, ते ही इतक्या मोठ्या सामन्यात. टीम इंडिया इतका मोठा धोका पत्करणार का?