Rohit Sharma: T20 क्रिकेटमधून रिटायर होणार नाही, म्हणणाऱ्या रोहित शर्माला BCCI कडून स्पष्ट संदेश
नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्माची निवड झाली नाही. या नंतर न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड होण्याची शक्यता नाहीय.
मुंबई: टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी टीमचा कॅप्टन रोहित शर्माने T20 क्रिकेटमधून इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याच सांगितलय. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्माची निवड झाली नाही. या नंतर न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड होण्याची शक्यता नाहीय. रोहित शर्माच टी 20 क्रिकेटमधील करिअर संपल्याची चर्चा रंगली आहे. काल रोहितला याबद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने इतक्यात टी 20 क्रिकेटमधून बाहेर पडणार नसल्याच सांगितलं.
रोहितची इच्छा काय?
रोहित शर्माची अजूनही टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा आहे. पण बीसीसीआयचा विचार स्पष्ट आहे. रोहित आणि विराट दोघांची टी 20 टीममध्ये पुन्हा निवड करणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलय. इनसाइड स्पोर्ट्ने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं.
बीसीसीआय अधिकाऱ्याच महत्त्वाच विधान
“कुठल्या एका व्यक्तीचा नाही, तर भारतीय क्रिकेटच हित सर्वात जास्त कशामध्ये आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाच आहे. रोहित-विराटच्या पुढे पाहण्याची वेळ आलीय. भविष्याचा विचार करुन टीम बनवायची आहे. पण अंतिम निर्णय काय घ्यायचा? ते सिलेक्टर्स ठरवतील” असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.
रोहितने काय उत्तर दिलं?
भारत-श्रीलंका पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत रोहितला त्याच्या टी 20 करिअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिलं की, “टी 20 क्रिकेटमध्ये खेळण्याबद्दल मी गंभीर आहे. सध्या सिनियर्सना ब्रेक देण्यात आलाय. मी टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही” IPL नंतर काय होत ते पाहू
“सतत सामने खेळत राहणं शक्य नाहीय. सर्व फॉर्मेटमधील प्लेयर्सना ब्रेक मिळाला पाहिजे. मी सुद्धा सर्व फॉर्मेटमधल्या खेळाडूंमध्ये येतो. न्यूझीलंड विरुद्ध तीन टी 20 सामने आहेत. आयपीएलनंतर काय होतं, ते पाहू. हा फॉर्मेट सोडण्याबद्दल मी विचार केलेला नाही” असं रोहित म्हणाला.