टीम इंडियाच्या T 20 World cup टीममध्ये मोहम्मद शमीचं सिलेक्शन का झालं नाही? वाचा Inside Story
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी काल टीम इंडिया जाहीर करण्यात आली. BCCI च्या सिलेक्शन कमिटीने जाहीर केलेल्या टीममध्ये कुठलीही धक्कादायक निवड नाहीय.
मुंबई: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी काल टीम इंडिया जाहीर करण्यात आली. BCCI च्या सिलेक्शन कमिटीने जाहीर केलेल्या टीममध्ये कुठलीही धक्कादायक निवड नाहीय. पण काही अपेक्षित खेळाडूंना टीममध्ये स्थान मिळालेलं नाहीय. त्यावरुन क्रिकेट पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोहम्मद शमी यापैकी एक आहे.
अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय
मोहम्मद शमीला थेट वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. त्याला स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. आशिया कपमध्ये टीम इंडियाने खराब प्रदर्शन केलं. त्यानंतर काही दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्याचा सल्ला दिला होता.
सिलेक्शन कमिटीने स्टँडबायवर ठेवलं
अनुभव लक्षात घेता मोहम्मद शमीची टीममध्ये निवड होईल, असं अनेकांना वाटत होतं. पण सिलेक्शन कमिटीने शमीला स्टँडबायवर ठेवलं आहे. त्याचा थेट 15 प्लेयर्समध्ये समावेश केलेला नाही. मोहम्मद शमीचा टीममध्ये का समावेश केलेला नाही? त्याची काही कारणं आता समोर आली आहेत. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
टीम मॅनेजमेंटमध्ये त्या दोघांच मत महत्त्वाचं
इंडियन टीमच्या टीम मॅनेजमेंटमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड आहेत. त्यांना टीममध्ये फिरकी गोलंदाजीत वैविध्य हवे होते. त्यामुळे मोहम्मद शमीची टीममध्ये निवड झाली नाही.
One title ? One goal ? Our squad ??#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ
— BCCI (@BCCI) September 12, 2022
म्हणून अर्शदीपची निवड झाली?
सिलेक्शन कमिटीने आधीच चार वेगवान गोलंदाजांची टीममध्ये निवड केली आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमधून सावरले आहेत. त्यांनी सुद्धा टीममध्ये कमबॅक केलं आहे. भुवनेश्वर कुमार टीममध्ये आहेत. त्याशिवाय अर्शदीप सिंहला सुद्धा स्थान मिळालय. पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याचं कौशल्य अर्शदीपकडे आहे. त्याशिवाय या चौकडीच्या मदतीला ऑलराऊंडर हार्दिक पंड्या सुद्धा आहे.
का फिरकी गोलंदाज हवेत?
कॅप्टन आणि कोचच्या मते उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया फिरकी गोलंदाजीला मदत करतात. त्यामुळे फिरकी गोलंदाजीत त्यांना वैविध्य हवे होते. त्यामुळे मोहम्मद शमीला डावलण्यात आलं.