T20 WC: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ‘या’ विकेटकीपरवर दाखवणार विश्वास
टीम इंडियाकडे दोन विकेटकीपर आहेत. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत. या दोघांपैकी कोणाला खेळवणार?
मुंबई: टी 20 वर्ल्ड कपला (T20 World cup) सुरुवात होण्याआधी रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम आणखी दोन वॉर्म अप मॅच (Warm up Match) खेळणार आहे. कालच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पराभव केला. टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण मुख्य वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर हे पराभव परवडणारे नाहीत. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बद्दल अजूनहूी संभ्रम आहे. टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असेल? याबद्दल अजूनही कोणी ठोसपणे सांगू शकत नाही.
दोघांपैकी कोणाला खेळवणार?
टीम इंडियाकडे दोन विकेटकीपर आहेत. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत. या दोघांपैकी कोणाला खेळवणार? हा प्रश्न आहे. तूर्तास ऋषभ पंत टीम मॅनेजमेंटच्या प्लानमध्ये नाहीय. ऋषभने टी 20 मध्ये अपेक्षित कामगिरी केलेली नाही. टीम मॅनेजमेंटचा ऋषभ पंतवर विश्वास नाहीय. त्यामुळे 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऋषभ पंत खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे.
पंत-कार्तिकपैकी कोणाला संधी?
मागच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात ऋषभ पंतने फक्त 9 धावा केल्या. या दोन सामन्यात दिनेश कार्तिकनेही फार चांगली कामगिरी केली नाही. ऋषभ पंतने टीम मॅनेजमेंटचा विश्वास गमावलाय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो खेळताना दिसणार नाही, ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाच्या सूत्रांनी हे सांगितलं. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
कोणी किती धावा केल्या?
2022 मध्ये दिनेश कार्तिकने 181 चेंडूत 273 धावा केल्या. तो 19 इनिंग खेळला. ऋषभ पंतने 17 इनिंगमध्ये 338 धावा केल्या. टीम इंडियाला अपेक्षित रोलमध्ये त्याने या धावा केलेल्या नाहीत. कार्तिक फिनिशरच्या रोलमध्ये आहे. त्याने 150.82 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात. पंतने 136.84 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात. t