Sri vs IND Match: टीम इंडियाला ती चूक पडली महागात, सामना बरोबरीत सुटल्यानंतर रोहित शर्माही बोलून गेला…
शेवटची विकेट म्हणून अर्शदीप सिंग बाद झाला. त्यामुळे त्याला पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. पण या सामन्यात भारताकडून सर्वात मोठी चूक झाली ती अर्शदीप सिंगचा शॉट नव्हे तर शिवम दुबेची विकेट आहे. शिवम दुबेने 48व्या षटकातील चौथ्या चेंडूवर घाई केली
Sri vs IND 1st ODI Match Tied: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मलिकेचा पहिला सामना कोलंबोमध्ये झाला. हा रोमहर्षक सामना टाय झाला. या सामन्यात अनेक वेळा विजयाची बाजू कधी एका संघाकडे कधी दुसऱ्या संघाकडे जात होती. परंतु शेवटी सामना बरोबरीत सुटला. भारतीय संघ शेवटच्या षटकांमध्ये विजयापर्यंत आला होता. परंतु हातातोंडाशी आलेला विजय हिरवून घेतला गेला. एका वेळी टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूत फक्त 1 धावा करायची होती. परंतु त्यानंतर जे झाले, त्यामुळे भारतीय संघातील चाहते नाराज झाले.
टीम इंडियाला एक चूक पडली महागात
सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकली. त्यानंतर 50 षटकांत 8 गडी गमावून 230 धावा केल्या. त्याला उत्तर देताना टीम इंडिया 47.5 षटकात 230 धावाच करु शकले. त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. या सामन्यात शेवटी भारतीय संघाला 18 षटकांत 5 धाव हव्या होत्या. त्यावेळी भारताकडे 2 फलंदाज होते. शिवम दुबे याने 48 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकर मारला. त्यामुळे भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित झाला होतो. परंतु यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने जादुई गोलंदाजी केली. त्याने सलग 2 चेंडूत 2 बळी घेत सामना बरोबरीत आणला.
शेवटची विकेट म्हणून अर्शदीप सिंग बाद झाला. त्यामुळे त्याला पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. पण या सामन्यात भारताकडून सर्वात मोठी चूक झाली ती अर्शदीप सिंगचा शॉट नव्हे तर शिवम दुबेची विकेट आहे. शिवम दुबेने 48व्या षटकातील चौथ्या चेंडूवर घाई केली आणि त्याची विकेट गमावली. शिवम दुबे खेळपट्टीवर स्थिरावला होता. तो 24 चेंडूत 25 धावांवर खेळत होता. खेळपट्टीवर तो भारतीय टीममध्ये असणारा शेवटचा फलंदाज होतो. परंतु तोच आपली विकेट गमावून बसला. ते भारतीय संघाला चांगलेच महागात पडले.
रोहित म्हणाला, मी निराश झालो…
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याला आपली नाराजी लपवता आली नाही. रोहित म्हणाला की, लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागते. आम्ही सामन्यात काही वेळा चांगली फलंदाजी केली पण ती लय पुढे राखता आली नाही. आम्ही चांगली सुरुवात केली. फिरकी आल्यावर खेळ बदलेल हे आम्हाला माहीत होते. आम्ही काही विकेट गमावल्या आणि मागे पडलो. 15 चेंडूत एकही धाव काढता न आल्याने निराश झालो आहे, पण मी जास्त बोलणार नाही.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.