Ravindra jadeja च्या दुखापतीचं कारण समजल्यानंतर BCCI चे पदाधिकारी खवळले
नुकतीच रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. आशिया चषक स्पर्धेच्या मध्यावरच जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. रवींद्र जाडेजा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार नाहीय.
मुंबई: नुकतीच रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. आशिया चषक स्पर्धेच्या मध्यावरच जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. रवींद्र जाडेजा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार नाहीय. कारण तो पर्यंत फिट होणं त्याच्यासाठी शक्य नाहीय. रवींद्र जाडेजा ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. चेंडू प्रमाणेच बॅटने सुद्धा तो ततिकच महत्त्वाच योगदान देतो.
या सगळ्याची काय गरज होती?
रवींद्र जाडेजाचं वर्ल्ड कपमध्ये न खेळणं हा टीम इंडियासाठी एक झटका आहे. खरंतर रवींद्र जाडेजाला झालेली दुखापत टाळता आली असती. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना या दुखापतीच कारण समजल्यानंतर ते सुद्धा खवळले आहेत. तुम्हाला या दुखापतीचं कारण समजल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल, या सगळ्याची काय गरज होती?.
कशामुळे झाली दुखापत?
अनावश्यक टीम बाँडिंगच्या कार्यक्रमामुळे रवींद्र जाडेजाला गुडघ्याची दुखापत झाली आहे. ही क्रिकेटच्या मैदानावर खेळताना झालेली दुखापत नाही. रवींद्र जाडेजा टीमच्या प्रत्येक सेशनला उपस्थित असायचा. स्की बोर्डवर बॅलन्स करताना रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली. रवींद्र जाडेजाला आधीपासूनच गुडघ्याचा त्रास सुरु होता. या दुखापतीमुळे त्यात अजूनच भर पडली.
हे सर्व टाळता आलं असतं
मोठ्या स्पर्धेआधी हे सर्व टाळता आलं असतं, असं बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे. अनावश्यक टीम बाँडिंगच्या कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे बीसीसीआय नाराज आहे. इनसाइट स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
टीम मॅनेजमेंटसाठी एक धडा
टीम बाँडिंगची Activity असल्यामुळे खेळाडूंना त्या दिवशी ट्रेनिंग आणि नेट सेशनमधून सुट्टी देण्यात आली होती. लंच, डिनर किंवा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी खेळाडू एकत्र जाऊ शकतात. खेळाडूंना क्रिकेट व्यतिरिक्त थोडावेळ एकत्र घालवता यावा, जेणेकरुन त्यांच्या कामगिरीत अधिक सुधारणा होईल, त्यासाठी हे सेशन होतं. जाडेजा बरोबर घडलेला प्रकार टीम मॅनेजमेंटसाठी एक धडा आहे.
Activity ट्रेनिंग मॅन्युलचा भाग नव्हती
“साहसी क्रीडा प्रकार असल्याने रवींद्र जाडेजाला स्की-बोर्डवर स्वत:चा बॅलन्स, तोल सावरायचा होता. हा ट्रेनिंग मॅन्युलचा भाग नव्हता. हे अनावश्यक होतं. तोल सावरताना जाडेजा पडला आणि त्याच्या गु़डघ्याला गंभीर मार लागला. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. परिणामी तो वर्ल्ड कप टीमच्या बाहेर गेला” टाइम्स ऑफ इंडियाने सूत्राच्या हवाल्याने हे म्हटलं आहे.