मोठी बातमी: टीम इंडियाच्या T20 WC टीममध्ये होऊ शकतो बदल

T20 WC: BCCI ची सिलेक्शन कमिटी घेऊ शकते मोठा निर्णय, 'त्या' एका रिपोर्टवर सर्व काही अवलंबून

मोठी बातमी: टीम इंडियाच्या T20 WC टीममध्ये होऊ शकतो बदल
भारतीय क्रिकेट संघImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 2:10 PM

मुंबई: BCCI च्या सिलेक्शन कमिटीने T20 World cup साठी टीम काही दिवसांपूर्वी जाहीर केली. बरेच प्रयोग आणि वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिल्यानंतर वर्ल्ड कपसाठी टीम निवडण्यात आली आहे. टीम जाहीर झाल्यानंतर काही खेळाडूंना संधी मिळाला नाही, त्यावर बरीच चर्चा झाली. क्रिकेटच्या जाणकारांनी आपआपल्या नजरेतून या टीमबद्दल मत व्यक्त केलं.

असं होऊ नये, म्हणून बरीच मेहनत घेतलीय

मागच्यावर्षी दुबईत T20 वर्ल्ड कप झाला होता. त्यावेळी ग्रुप स्टेजमध्येच टीम इंडियाचा आव्हान संपुष्टात आलं होतं. यावेळी असं होऊ नये, म्हणून बीसीसीआयने बरीच मेहनत केली आहे. प्रत्यक्ष वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला चांगला सराव मिळावा, यासाठी वेगवेगळ्या देशांबरोबर टी 20 मालिका खेळवण्यात आल्या.

कुठल्या दोन खेळाडूंमुळे बदल होणार?

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीमबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. गरज पडल्यास, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये बदल होऊ शकतो. मोहम्मद शमी आणि दीपक हुड्डा या दोन खेळाडूंमध्ये हे बदल होऊ शकतात.

अखेरच्या क्षणी होऊ शकतो बदल

मोहम्मद शमी अजूनही कोविड-19 मधून सावरलेला नाही. दीपक हुड्डा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यामुळे त्यांचा आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होत असलेल्या टी 20 सीरीजमध्ये समावेश केलेला नाही.

आयपीएल 2022 पासून मोहम्मद शमी एकही टी 20 सामने खेळलेला नाही. त्यामळे गरज असल्यास अखेरच्या क्षणी बदल होऊ शकतो. बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

तो एक रिपोर्ट महत्त्वाचा

“मोहम्मद शमी टी 20 वर्ल्ड कपआधी एकही टी 20 चा सामना खेळलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. तो फिट होईल आणि सराव सामने खेळेल, अशी अपेक्षा आहे. टीममध्ये बदल करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. एकदा दीपक हुड्डाचा रिपोर्ट मिळाला की, अधिक स्पष्टता येईल. सध्यातरी रिझर्व्ह खेळाडूंसह तीच टीम राहिलं” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.

कधीपासून शमी टी 20 चा सामना खेळलेला नाही?

मोहम्मद शमी टी 20 वर्ल्ड कप टीमच्या रिझर्व्ह खेळाडूंमध्ये आहे. त्याला कोविडची लागण झाली. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये खेळू शकला नाही. तो अजूनही रिकव्हर झालेला नाही. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेलाही मुकला आहे. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपनंतर तो टीम इंडियाकडून एकही टी 20 सामना खेळलेला नाही.

शमी कधी रिकव्हर होणार?

“शमी कधी रिकव्हर होईल ते सांगण कठीण आहे. त्याच्या कार्डियो-व्हॅसक्युलर टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल येणं आवश्यक आहे. सध्यातरी आम्ही मेडीकल टीमकडून हिरवाकंदील मिळण्याची वाट पाहतोय. टेस्ट पास केल्यानंतर तो टीमसोबत सहभागी होऊ शकतो” असं अधिकाऱ्याने सांगितलं.

'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.