India T20 WC Squad: मुदतीमध्ये Jasprit Bumrah च्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड नाही, आता पुढे काय?
ICC ची डेडलाइन संपली आहे. मुदतीमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड केलेली नाही. आता पुढे काय पर्याय
मुंबई: टीम इंडियाने अजूनही टी 20 वर्ल्ड कपसाठी Jasprit Bumrah च्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड केलेली नाही. बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जसप्रीत बुमराह T20 World cup मध्ये खेळणार नाहीय. टीम इंडियासाठी (Team Idnia) हा एक मोठा झटका आहे. कारण जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. परफेक्ट यॉर्कर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात जसप्रीत बुमराह माहीर आहे.
कोणाचं पारडं जड?
टीम इंडियाला जसप्रीत बुमराहच्या जागी दुसऱ्या गोलंदाजाची निवड करावी लागणार आहे. मोहम्मद शमी आणि दीपक चाहर या दोन स्टँडबाय खेळाडूंमध्ये मुख्य स्पर्धा आहे. अनुभवाचा विचार करता मोहम्मद शमीच पारडं जड आहे.
फिटनेस टेस्ट पास करावी लागेल
मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांना वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. दोघेही सध्या एनसीएमध्ये आहेत. कोविड 19 मधून सावरलेला मोहम्मद शमी फिटनेस टेस्ट देण्यासाठी तयार आहे. दीपक चाहरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये दुखापत झाली.
ICC ची रिप्लेसमेंट म्हणजे पर्यायी खेळाडूची निवड करण्यासाठीची मुदत संपली आहे. आता वर्ल्ड कप टीममध्ये बदल करताना बीसीसीआयला आयसीसीची मंजुरी मिळवावी लागेल.
तो फिटनेस टेस्ट देण्याच्या स्थितीमध्ये नाही
“दीपक चाहर एनसीएमध्ये आहे. तो फिटनेस टेस्ट देण्याच्या स्थितीमध्ये नाहीय. त्याच्यावर सध्या मेडीकल टीमच लक्ष आहे. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. शमी कोविडमधून सावरतोय. तो वर्ल्ड कपसाठी फिट होईल. लवकरच जसप्रीतच्या जागी खेळाडूची निवड जाहीर केली जाईल” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.
बदल करण्यापूर्वी आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार, वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या टीम्सना 9 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या स्क्वाडमध्ये बदल करण्याची संधी होती. आता मुदत संपली आहे. टीममध्ये आता कुठलाही बदल करण्यापूर्वी आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल.