T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार
यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.
नवी दिल्ली: यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव झाला होता. यंदा किताब जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मुख्य टी 20 वर्ल्ड कप आधी संघ व्यवस्थापनाला तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवायची नाहीय.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत खेळणार टी 20 मालिका
भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळेल. त्यानंतर तितक्याच सामन्यांची टी 20 मालिका होईल. 20 सप्टेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना मोहाली मध्ये खेळला जाईल. त्यानंतर 23 सप्टेंबरला दुसरा सामना नागपूर आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद मध्ये होईल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळेल. सीरीजचा पहिला सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रम येथे, दुसरा सामना 1 ऑक्टोबरला गुवाहाटीत आणि शेवटचा सामना 3 ऑक्टोबरला इंदूर मध्ये होईल. टी 20 सीरीज नंतर वनडे मालिका होईल.
एकाच वेळी दोन सीरीज खेळणार भारत
टी 20 वर्ल्ड कप साठी निवडले जाणारे खेळाडू वनडे सीरीज मध्ये दिसणार नाहीत. ही सीरीज सुरु होईपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला असेल. आमच्याकडे एकाचवेळी दोन मजबूत संघ आहेत, असं सचिव जय शाह यांनी आधीच सांगितलं होतं, बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला हे सांगितलं. म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीज तेव्हा खेळली जाणार, जेव्हा एक संघ टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असेल.
कोलकाताऐवजी दिल्ली मध्ये शेवटची वनडे
वनडे सीरीज मधला शेवटचा सामना कोलकाता मध्ये खेळवायची योजना होती. पण असं होऊ शकलं नाही. रोटेशन पॉलिसीनुसार, शेवटची वनडे कोलकाता मध्ये होणार होती. पण दुर्गा पूजा असल्याने बंगाल क्रिकेट संघ सणाच्यावेळी सुरक्षा देऊ शकणार नाही. म्हणूनच दिल्ली मध्ये हा सामना खेळवण्यात येईल.