WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या उभय संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. (India Tour of England India Crickters Cannot meet each other in between Quarantine period)
मुंबई : टीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. 2 जून रोजी मध्यरात्री भारतीय संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण घेतलं. 3 जून रोजी संघ लंडनमध्ये पोहोचला. तिथून साऊथहॅम्प्टन… पण आता कोरोनाना संसर्गाच्या अनुषंगाने ब्रिटन सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार भारतीय खेळाडूंना आता क्वारंटाईन रहावं लागणार आहे. इथून पुढे 3 दिवस त्यांना बंद खोलीत रहावं लागेल. यादम्यान खेळाडूंना एकमेकांना भेटता येणार नाही. (India Tour of England India Crickters Cannot meet each other in between Quarantine period)
तीन दिवसांचा क्वारंटाईन पिरियड
न्यूझीलंड आणि भारत यांच्याच 18 ते 23 जूनदरम्यान साऊथहॅम्प्टनच्या क्रिकेट ग्राऊंडवर सामना रंगेल. या सामन्याची उत्सुकता दोन्ही देशांच्या खेळाडूंना आहे. WTC फायनलअगोदर न्यूझीलंडच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी सध्या एक कसोटी सुरु आहे. तर भारतीय संघ कालच म्हणजे 3 जूनला साऊथहॅम्प्टनला पोहोचला आहे. आता भारतीय संघाला 3 दिवसांचा क्वारंटाईन पिरीयड पूर्ण करायचा आहे.
खेळाडूंच्या कोरोना टेस्ट होणार
न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये मात देण्यासाठी भारतीय संघाची खरी रणनिती ही मैदानावरच होईल परंतु त्याअगोदर भारतीय खेळाडूंना तीन दिनसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावं लागेल. या क्वारंटाईनच्या दिवसांत भारतीय खेळाडूंच्या रेग्युलर कोरोना टेस्ट केल्या जातील. यादरम्यान बायोबबलमधून बाहेर पडण्याची त्यांना परवानगी देण्यात येणार नाही.
भारताचे शिलेदार तयार
इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्याच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण टीमचे नेतृत्त्व करणार असून कोहलीसह अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हेही या दौऱ्यात असणार आहेत. या दौऱ्यात आधी डब्लूटीसीचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरोधात 5 कसोटी सामने भारत खेळणार आहे.
भारताचं 72 तासांचं विशेष मिशन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.
डब्लूटीसी फायनलसाठी एक अतिरिक्त दिवस
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. इंग्लंडच्या साउथहॅम्प्टन येथील मैदानात हा सामना खेळवला जाईल. त्या काळात तेथे पावसाचे वातावरण असण्याची शक्यता असल्याने सामन्यासाठी आयसीसीने 23 जूनचा एक अतिरिक्त दिवस राखीव ठेवला आहे.
(India Tour of England India Crickters Cannot meet each other in between Quarantine period)
हे ही वाचा :
VIDEO : मुलाचा अनोखा हेअर कट, द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स
Photo : विराट कोहली-अनुष्का शर्माचं मुंबईतलं घर कसं आहे? पाहा फोटो…
सुनील गावस्करांची भविष्यवाणी, भारत-इंग्लंड मालिका कोण जिंकणार, स्पष्टच सांगितलं!