India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

कॅमेऱ्यासमोर पोझ देताना जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावर हास्य होते, तर चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. बोर्डाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत आहेत.

India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:05 AM

मुंबई: कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) कालच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आज सकाळी भारतीय संघ मुंबईहून विशेष चार्टड विमानाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour) रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) विमानात बसलेल्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेला बॉक्सिंग डे च्या दिवशी २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

कॅमेऱ्यासमोर पोझ देताना जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावर हास्य होते, तर चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. बोर्डाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत आहेत.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नव्याने निवड झालेल्या रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला प्रकर्षाने जाणवेल. दुखातपतीमुळे रोहित शर्मा या कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. मुंबईत सरावा दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहितसह रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे दोन प्रमुख डावखुरे गोलंदाजही या मालिकेत खेळणार नाहीयत.

BCCI ला बाजू मांडावी लागली होती

कालची विराट कोहलीची पत्रकार परिषद वादग्रस्त ठरली होती. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच बीसीसीआयला समोर येऊन आपली बाजू मांडावी लागली होती. विराटने थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी पंगा घेतला आहे. टी-20 चे कर्णधारपद सोडणाऱ्या विराटने वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयने आपल्याशी व्यवस्थित संवाद ठेवला नाही, असा दावा काल विराटने केला होता.

भारतीय टेस्ट टीम– विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल. स्टँड बाय खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजान नागवासवाला

संबंधित बातम्या: विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय? कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.