IND vs ZIM: 18 ऑगस्टपासून सुरु होणार वनडे सीरीज, शेड्यूल पासून लाइव स्ट्रीमिंग पर्यंत सर्व माहिती इथे वाचा

वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर (West Indies Tour) टीम इंडिया आता लवकरच झिम्बाब्वे दैऱ्यावर (IND vs ZIM) रवाना होणार आहे.

IND vs ZIM: 18 ऑगस्टपासून सुरु होणार वनडे सीरीज, शेड्यूल पासून लाइव स्ट्रीमिंग पर्यंत सर्व माहिती इथे वाचा
team-indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 8:00 AM

मुंबई: वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर (West Indies Tour) टीम इंडिया आता लवकरच झिम्बाब्वे दैऱ्यावर (IND vs ZIM) रवाना होणार आहे. भारत या सीरीज मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) सोपवण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेआधी ही सीरीज टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. या सीरीजच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज दीपक चाहर पुनरागमन करतोय. धवनने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत यशस्वी नेतृत्व केलं. “मी भारतासाठी जो पर्यंत खेळेन, तो पर्यंत टीमसाठी उपयुक्त राहीन. मला संघावर ओझ बनायचं नाही” असं शिखर धवन म्हणाला होता.

माझा गोलंदाजांवर विश्वास

टीमच्या नेतृत्वाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की, “माझा माझ्या गोलंदाजांवर विश्वास आहे. टॉप लेव्हलवर खेळताना सगळेच व्यावसायिक असतात. सगळ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असते. गोलंदाजांची रणनिती चालली नाही, तर आमच्याकडे दुसरी योजना तयार असते”

आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग

ही सीरीज आयसीसी पुरुष वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग आहे. पुढच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेत प्रवेश मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. भारताने 2016 मध्ये शेवटचा झिम्बाब्वे दौरा केला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीमने तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळले होते.

वनडे सीरीजचं संपूर्ण शेड्यूल

18 ऑगस्ट– पहिली वनडे – हरारे – दुपारी 12.45

20 ऑगस्ट – दुसरी वनडे – हरारे – दुपारी 12:45

22 ऑगस्ट – तीसरी वनडे – हरारे – दुपारी 12:45

कधी खेळली जाणार भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीज? भारत आणि झिम्बाब्वे मध्ये वनडे सीरीज 18 ऑगस्टला सुरु होईल. 22 ऑगस्टला ही मालिका संपेल.

कुठे खेळली जाणार भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीज?

भारत- झिम्बाब्वे वनडे सीरीज मधले सगळे सामने हरारे मध्ये खेळले जाणार.

कुठे पाहू शकता भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजचं लाइव टेलीकास्ट?

भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजच लाइव टेलीकास्ट सोनी नेटवर्क स्पोर्ट्स वर पाहता येईल, तसंच डीडी स्पोर्ट्स वर सुद्धा लाइव ब्रॉडकास्ट केलं जाईल.

कुठे पाहू शकता भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजचं लाइव स्ट्रीमिंग?

भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजच लाइव स्ट्रीमिंग सोनी लिव वर पाहता येईल.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ

शिखर धवन (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.