IND vs SA: टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांची कमाल, दक्षिण आफ्रिकेत भारताने जिंकली सीरीज

IND vs SA: T20 सीरीजच्या पहिल्या चार सामन्यात टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. 2 गोलंदाजांनी घेतल्या 5 विकेट.

IND vs SA: टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांची कमाल, दक्षिण आफ्रिकेत भारताने जिंकली सीरीज
ind vs sa Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 12:09 PM

डरबन: भारताच्या अंडर 19 महिला टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा T20 सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला टीमने 5 टी 20 सामन्यांची सीरीज जिंकली आहे. मालिकेतील एक सामना अजून बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तरी सीरीज भारताच्याच नावावर होईल. टी 20 सीरीच्या पहिल्या चार सामन्यात टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. सीरीजचा दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. मालिकेतील पहिला टी 20 सामना भारताने 54 धावांनी जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर 19 टीमने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या टी 20 सामन्यात 4 विकेटने हरवलं.

शेवटचा टी 20 सामना कधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरीजमधील पाचवा व शेवटचा टी 20 सामना 4 जानेवारीला खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेची महिला टीम प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना खेळेल.

88 चेंडूत जिंकला चौथा सामना

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी 20 सामना 15 ओव्हर पूर्ण होण्याआधीच जिंकला. भारताच्या दोन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची वाट लावली. त्यामुळे टीम इंडिया हा सामना लवकर जिंकणार असा अंदाज होता.

टीम इंडियाच्या 2 गोलंदाजांची कमाल

भारताच्या अंडर 19 महिला टीमच्या दोन गोलंदाज फलक आणि नजलाने मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. नजलाने 3 ओव्हरमध्ये 4 धावा देऊन 3 विकेट काढल्या. फलकने 4 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन 2 विकेट काढल्या. दोघींनी किफायती आणि प्रभावी गोलंदाजी केली. परिणामी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 महिला टीमने चौथ्या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून फक्त 86 धावा केल्या. टीम इंडियाकडून शेफाली वर्माच्या सर्वाधिक धावा

टीम इंडियाला विजयासाठी 87 धावांच सोप लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने 14.4 ओव्हर्समध्येच लक्ष्य गाठलं. भारताने सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 विकेट गमावल्या. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 29 धावा केल्या. या इनिंगमध्ये शेफालीचा स्फोटक फलंदाजीचा अंदाज दिसला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.