India vs Afghanistan T20 Live Streaming: अफगाणिस्तान विरुद्ध सामना तुम्ही कधी, कुठे, कसा पाहू शकता, जाणून घ्या सर्व डिटेल्स
India vs Afghanistan T20 Live Streaming: आशिया कप स्पर्धेत गुरुवारी टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. सुपर 4 च्या पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला.
मुंबई: आशिया कप स्पर्धेत गुरुवारी टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. सुपर 4 च्या पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. टीम इंडियाने ग्रुप राऊंडमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या टीमवर विजय मिळवून सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. अफगाणिस्तानची टीम ग्रुपमध्ये टॉपवर होती.
अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक करणार नाही
टीम इंडियाचा पुढचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक करणार नाही. त्यांच्याकडे राशिद खान, मुजीब जादरान, मोहम्मद नबी, हजरतुल्लाह आणि रहमानुल्ला गुरबाजसारखे टी 20 मधले दमदार खेळाडू आहेत. या टीममध्ये पावर हिटर आहेत. अफगाणिस्तानची टीम 170 धावांचे लक्ष्यही पार करु शकते.
भारत आणि अफगाणिस्तानात आशिया कप 2022 चा सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि अफगाणिस्तानात आशिया कप 2022 चा सामना गुरुवारी 7 सप्टेंबरला खेळला जाईल.
भारत-अफगाणिस्तानात आशिया कप 2022 चा सामना कुठे होणार?
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला जाईल.
भारत आणि अफगाणिस्तानात आशिया कप 2022 चा सामना कधी सुरु होणार?
भारत आणि अफगाणिस्तानात आशिया कप 2022 चा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवला जाईल.
भारत-अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत आणि अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल.
भारत आणि अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल? भारत आणि अफगाणिस्तानमधील आशिया कप 2022 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही TV9marathi.com वाचू शकता.