IND vs AUS : Ravindra Jadeja ने 5 दिवसात अपयश मागे सोडलं, तासभर एकटाच बसला, बदलून टाकली गोष्ट
IND vs AUS : गोलंदाजीत हिरो ठरलेल्या रवींद्र जाडेजाने आपल्या बॅटिंगच्या बळावर काल टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवून दिला. जाडेजाने त्यावेळी जो विचार केला, त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून आला.
IND vs AUS 1st ODI : चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा अहमदाबाद कसोटी सामना ड्रॉ झाला. पण टीम इंडियाने 2-1 अशी सीरीज जिंकली. रवींद्र जाडेजा आणि आर.अश्विनला प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला. संपूर्ण सीरीजमध्ये 22 विकेट घेणाऱ्या जाडेजाने सामना संपल्यानंतर आपण फलंदाजीमुळे निराश असल्याच सांगितलं होतं.
अवघ्या चार दिवसात त्याची निराशा यशामध्ये बदलली. गोलंदाजीत हिरो ठरलेल्या रवींद्र जाडेजाने आपल्या बॅटिंगच्या बळावर काल टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवून दिला.
त्या विचाराचा परिणाम शुक्रवारी दिसला
रवींद्र जाडेजाने बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यात पाच इनिंगमध्ये 135 धावा केल्या होत्या. जाडेजा आपल्या प्रदर्शनावर खुश नव्हता. अश्विनने सांगितलं की, अहमदाबाद टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी आऊट झाल्यानंतर जाडेजा ड्रेसिंग रुममध्ये एकटाच एक तास बसून होता. जाडेजाने त्यावेळी जो विचार केला, त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून आला.
जाडेजाने मिळवून दिला विजय
रवींद्र जाडेजा शुक्रवारी या वर्षातील आपला पहिला वनडे सामना खेळला. याआधी मागच्यावर्षी इंग्लंड विरुद्ध तो शेवटचा वनडे सामना खेळला होता. 8 महिन्यानतंर जाडेजा पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसला. त्याच्यामध्ये एक समजदार, परिपक्व मॅच विनर दिसला. जाडेजाने पहिल्या वनडेत फक्त चेंडूनेच नाही, बॅटने सुद्धा कमाल दाखवली. त्याने त्याच्या 9 ओव्हरच्या स्पेलमध्ये 2 विकेट काढले.
#TeamIndia go 1⃣-0⃣ up in the series! ? ?
An unbeaten 1⃣0⃣8⃣-run partnership between @klrahul & @imjadeja as India sealed a 5⃣-wicket win over Australia in the first #INDvAUS ODI ? ?
Scorecard ▶️ https://t.co/BAvv2E8K6h @mastercardindia pic.twitter.com/hq0WsRbOoC
— BCCI (@BCCI) March 17, 2023
जाडेजाच्या बॅटिंगमध्ये परिपक्वता
रवींद्र जाडेजा बॅटिंगसाठी क्रीजवर उतरला, तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 83/5 होता. विजयासाठी टीम इंडियाला 106 धावांची गरज होती. तिथून जाडेजा आणि केएल राहुलने डाव संभाळला. टीमला विजय मिळवून दिला. त्यानंतर ते पॅव्हेलियनमध्ये परतले. टॉप बॅट्समन बाद झाल्यानंतर जाडेजाने फलंदाजीत परिपक्वता दाखवली. दोघांनी कुठलाही धोका पत्करला नाही. सिंगल धावांवर भर दिला. सेट झाल्यानंतर दोघांनी आक्रमक बॅटिंग केली. राहुलसोबत जाडेजाने नाबाद 108 धावांची भागीदारी केली. 69 चेंडूत जाडेजाने पाच चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. या भागीदारीमुळेच ऑस्ट्रेलियन टीमने सामना गमावला.