IND vs AUS : वनडेमध्ये टीम इंडियाला लागलय सूर्यग्रहण, 15 सामन्यांपासून नुसता अंधार

IND vs AUS : हे सूर्यग्रहण कधी संपणार? चमकण्याची संधी पुन्हा वाया घालवली. टीम इंडियाच्या या प्रमुख खेळाडूच फॉर्ममध्ये येण आवश्यक आहे. एकहाती मॅच फिरवण्याची ताक या खेळाडूंमध्ये आहे.

IND vs AUS : वनडेमध्ये टीम इंडियाला लागलय सूर्यग्रहण, 15 सामन्यांपासून नुसता अंधार
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 9:11 AM

IND vs AUS 1st ODI : भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजची सुरुवात विजयाने केली आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाच विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये टीम इंडियाचे स्टार बॅट्समन फ्लॉप ठरले. यात सूर्यकुमार यादवही आहे. वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमारचा फ्लॉप शो या सीरीजमध्येही कायम आहे. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने मुंबईमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी सूर्यकुमार यादवची टीम इंडियात निवड झाली. सूर्यकुमार यादव बॅटिंगसाठी आला, त्यावेळी टीम इंडियाच्या 14 रन्सवर 2 विकेट गेल्या होत्या.

कोहली बाद झाल्यानंतर सूर्या क्रीजवर आला. तो पहिल्याच चेंडूवर LBW आऊट झाला. सूर्याचा खेळ फक्त एका चेंडूत संपला. तो गोल्डन डकवर आऊट झाला.

वनडेमध्ये सूर्याच्या किती धावा?

सूर्यकुमार यादवने वनडेमध्ये डेब्यु केल्यानंतर काही चांगल्या इनिंग खेळला. पण नंतर त्याची लय बिघडली. टी 20 क्रिकेटमध्ये स्फोटक बॅट्समन म्हणून सूर्यकुमारची ओळख आहे. पण वनडे फॉर्मेटमध्ये तो काही खास करु शकलेला नाही. त्याने 21 वनडे सामन्यात 19 इनिंगमध्ये 27.06 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतक निघाली आहेत.

सूर्याने वनडेत किती हाफ सेंच्युरी झळकवल्यात?

मागच्या 11 इनिंगमध्ये सूर्यकुमार यादव फक्त चारवेळा दुहेरी आकडा गाठू शकलाय. मागच्या 15 इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघालेलं नाही. टी 20 मध्ये त्याचा फॉर्म बिलकुल या उलट आहे. मागच्यावर्षी या फॉर्मेटमध्ये तो सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज होता. सूर्याला वनडेमध्ये जागा बनवणं जमेल का?

सूर्यकुमार यादवला वनडे फॉर्मेटमध्ये स्थान पक्क करायचं असेल, तर त्याला मोठ्या इनिंग खेळाव्या लागतील. संधी मिळाल्यानंतर स्वत:ला सिद्ध कराव लागेल. श्रेयस अय्यर अजून फिट नाहीय. तो पर्यंत सूर्यकुमार यादवकडे संधी आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो वनडेमध्ये स्वत:च स्थान निर्माण करण्याची शक्यता कमी वाटतेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.