Ind vs Aus, 1st T20I: आशिया कप हरणारी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी जिंकणार?
आशिया कपमध्ये टीम इंडिया कुठे चुकली? कुठली बाजू कमकुवत ठरली?
मुंबई: आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया दमदार खेळ दाखवू शकली नाही. परिणामी सुपर 4 मध्येच टीमच आव्हान संपुष्टात आलं. टीम इंडियाकडे विजेतेपदाचं प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. रोहित शर्माकडे या टीमच नेतृत्व होतं. आशिया कपमधील पराभवाने टीम मॅनेजमेंटसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तर टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या सीरीजमध्ये शोधण्याचा प्रयत्न करेल.
पहिला टी 20 सामना कधी?
मोहालीमध्ये टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 सीरीजमधला पहिला सामना खेळणार आहे. या सीरीजच्या निमित्ताने टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपसाठी कितपत सज्ज आहे, ते लक्षात येईल. टीमची मिडल ऑर्डर अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असेल.
सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न
वर्ल्ड कपआधी टीम इंडिया T20 चे सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. आधी ऑस्ट्रेलिया त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज खेळणार आहे. वर्ल्ड कपआधी टीम सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
गोलंदाजी बळकट होणार
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने चांगली फलंदाजी केली. पण टीममध्ये काही बदल सुद्धा झाले. टीम इंडियाच्या गोलंदाजीतील कमतरता आशिया कपमध्ये स्पष्टपणे दिसून आल्या. हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराहच्या समावेशाने गोलंदाजी आक्रमण अधिक धारदार होणार आहे. दुखापतीमुळे आशिया कपमध्ये दोघेही खेळू शकले नव्हते.
ओपनिंगला कोण येणार?
वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलच माझ्यासोबत ओपनिंगला येईल, हे रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. विराट कोहली सुद्धा सलामीला येण्याची शक्यता आहे. काही सामन्यात हे चित्र दिसू शकतं. विराट टी 20 च्या काही मॅचेसमध्ये ओपनिंगला उतरला आहे.
गोलंदाजीच कॉम्बिनेशन काय असेल?
आशिया कपमध्ये रवींद्र जाडेजाच्या दुखापतीमुळे गोलंदाजीच संतुलन बिघडलं होतं. टीम इंडियाला पाच गोलंदाजांसह खेळाव लागलं होतं. गोलंदाजीत सहावा ऑप्शन नव्हता. टीम इंडियाने जाडेजाच्या अक्षर पटेलला संधी द्यावी. त्यामुळे अतिरिक्त गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध होईल. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि हार्दिक पंड्या वेगवान गोलंदाजीचा भार संभाळतील. त्याशिवाय अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाज टीममध्ये असू शकतात. ऑस्ट्रेलियातील कंडीशन्स लक्षात घेऊन टीम मॅनेजमेंटला टीम कॉम्बिनेशन बनवायचं आहे.