IND vs AUS 2nd Test : सर जाडेजाची कमाल, ऑस्ट्रेलियाची वाट लावली, भारतासमोर विजयासाठी सोपं लक्ष्य

IND vs AUS 2nd Test : आज रविवारी कसोटीच्या तिसऱ्यादिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियासाठी निराशाजनक झाली. रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

IND vs AUS 2nd Test : सर जाडेजाची कमाल, ऑस्ट्रेलियाची वाट लावली, भारतासमोर विजयासाठी सोपं लक्ष्य
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 11:24 AM

IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसऱ्यादिवशीच निकाल लागू शकतो. काल दुसऱ्यादिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाचा डाव सुस्थितीत वाटला होता. 1 बाद 61 त्यांची स्थिती होती. आज रविवारी कसोटीच्या तिसऱ्यादिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियासाठी निराशाजनक झाली. रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचा एकही बॅट्समन आज खेळपट्टीवर टिकून बॅटिंग करु शकला नाही. त्यांनी जाडेजा-अश्विनच्या फिरकीसमोर सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावात आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा फक्त 1 रन्सची नाममात्र आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांच लक्ष्य दिलं आहे.

जाडेजा-अश्विनची कमाल

रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने दुसऱ्याडावात ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट घेतल्या. अश्विनने त्याला योग्य साथ दिली. अश्विनने 3 विकेट काढल्या. दोन्ही फिरकीपटुंनी मिळून ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपवला. रवींद्र जाडेजाने 12.1 ओव्हर्समध्ये 42 धावात 7 विकेट काढल्या. रविचंद्रन अश्विनने 16 ओव्हर्समध्ये 59 रन्स देऊन 3 विकेट काढल्या. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा दोघांनी पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियने टीमने थोडा सरस खेळ दाखवला होता. ती कसर टीम इंडियाने दुसऱ्याडावात भरून काढली.

अश्विनसमोर स्मिथ हतबल

आज तिसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर ट्रेव्हिस हेडच्या रुपाने ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली. 43 रन्सवर अश्विनने त्याला विकेटकीपर श्रीकर भरतकरवी झेलबाद केलं. त्याने 6 चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या रुपाने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची मोठी विकेट मिळाली. अश्विनने स्मिथला अवघ्या 9 रन्सवर LBW आऊट केलं. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मानर्स लाबुशेनला जाडेजाने 35 रन्सवर क्लीन बोल्ड केलं. ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फक्त हजेरी

दुसऱ्याडावात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 43 आणि त्याखालोखाल लाबुशेनने 35 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. या दोघांव्यतिरिक्त दुसऱ्याडावात अन्य ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.

टीम इंडियाकडे चांगली संधी

पहिल्या डावात नॅथन लेयॉन वरचढ ठरला होता. त्याने पाच विकेट काढल्या होत्या. आता दुसऱ्याडावात तो वरचढ ठरणार नाही, याची काळजी टीम इंडियाला घ्यावी लागेल. विकेटवर बॉल खूपच टर्न होतोय, पण टीम इंडियाला विजयासाठी सोपं लक्ष्य मिळालय. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत आघाडी 2-0 ने वाढवण्याची संधी आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.