IND vs AUS Test : आता कोण वाचवणार? ‘या’ प्लेयरचा टीम इंडियातील खेळ संपल्यात जमा
IND vs AUS 2nd Test : टीम इंडियातील सर्वच खेळाडू विजयामध्ये योगदान देत असताना, एका प्लेयरचा खराब परफॉर्मन्स प्रकर्षाने दिसून येतोय. टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांच सोप लक्ष्य मिळालय.
IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात दिल्लीमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आजच या कसोटीचा निकाल लागेल अशी स्थिती आहे. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलल. आज रविवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून दिलं. त्यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन टीमने अक्षरक्ष: गुडघे टेकले. दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या टीमला ऑलआऊट केलं. रविंद्र जाडेजाने 7 तर रविचंद्रन अश्विनने 3 विकेट काढल्या. टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांच सोप लक्ष्य मिळालय. टीम इंडियाकडे मालिकेत 2-0 ने आघाडी वाढवण्याची संधी आहे.
एका प्लेयरचा खराब परफॉर्मन्स प्रकर्षाने दिसून येतोय
टीम इंडियातील सर्वच खेळाडू विजयामध्ये योगदान देत असताना, एका प्लेयरचा खराब परफॉर्मन्स प्रकर्षाने दिसून येतोय. त्याच नाव आहे केएल राहुल. या केएल राहुलला टीममध्येच का घेता? असा क्रिकेट विश्लेषकांपासून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींचा प्रश्न आहे. कारण केएल राहुलला आतापर्यंत बऱ्याच संधी दिल्यात. पण त्याला छाप उमटवणारी कामगिरी करता आलेली नाही.
ते टॅलेंट कुठेच दिसत नाही
केएल राहुलला टीममध्ये संधी देताना त्याच्यात प्रतिभा आहे, टॅलेंट आहे, असं सांगितलं जातं. पण ते टॅलेंट कुठेच दिसत नाही. जेव्हा पुढच्या सामन्यात तो बाहेर होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी एखाद-दुसर अर्धशतक झळकवून तो टीममध्ये आपलं स्थान टिकवतो. पण अलीकडच्या काही वर्षात त्याने टीम इंडियासाठी मॅच विनिंग खेळी केलीय किंवा प्रदर्शनात सातत्य अजिबात दिसलेलं नाही. त्यामुळे त्याला टीम बाहेर करण्याची मागणी सुरु आहे.
दोन्ही कसोटीत कामगिरी जैसे थे
आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी त्याची टीममध्ये फक्त निवडच झाली नाही, तर त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थानही मिळालं. पण त्याने फार काही फरक पडला नाही. कामगिरी तशीच राहिली. पहिल्या नागपूर कसोटीत तो फक्त 20 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर आता सुरु असलेल्या दिल्ली कसोटीत पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्याडावात फक्त 1 रन्सवर आऊट झाला. म्हणजे कामगिरी जैसे थे. त्याच्यासाठी शुभमन गिलवर अन्याय
याच केएल राहुलसाठी फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला बाहेर बसवलय. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरीजमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. वनडेमध्ये गिलने डबल सेंच्युरी तर टी 20 मध्ये शतक ठोकलं. महत्त्वाच म्हणजे शुभमन गिल क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. पण असं असूनही शुभमन गिलला फक्त केएल राहुलसाठी बाहेर बसवलय. आता केएल राहुलला अजून किती संधी देणार? हा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. त्याला पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वाटत नाही. या फ्लॉप कामगिरीमुळे उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात येणाऱ्या टीममध्ये केएल राहुलच्या नावाचा विचार होईल, असं वाटत नाही.