Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ‘हा’ मॅचविनर नाही खेळू शकणार, स्वबळावर मॅच जिंकवण्याची क्षमता

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एका मोठा प्लेयर खेळू शकणार नाहीय. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला या खेळाडूची कमतरता जाणवेल. या प्लेयरमध्ये स्वबळावर टीमला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे.

IND vs AUS Test : दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 'हा' मॅचविनर नाही खेळू शकणार, स्वबळावर मॅच जिंकवण्याची क्षमता
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 1:28 PM

India vs Australia, 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये सुरु होतोय. दोन्ही देशांमध्ये 4 टेस्ट मॅचची सीरीज खेळली जाणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर ही मॅच होतेय. सकाळी 9.30 वाजता सामना सुरु होईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एका मोठा प्लेयर खेळू शकणार नाहीय. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला या खेळाडूची कमतरता जाणवेल. या प्लेयरमध्ये स्वबळावर टीमला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. त्याला शेवटच्या बांग्लादेश विरुद्ध कसोटीत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला होता.

जिंकल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये बाहेर

कुलदीप यादवने या मॅचमध्ये एकूण 8 विकेट काढले होते. पहिल्या डावात त्याने केलेल्या 40 धावा सुद्धा उपयुक्त ठरल्या होत्या. भारताने बांग्लादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना 188 धावांनी जिंकला होता. त्यानंतर पुढच्याच मॅचमध्ये कुलदीप यादवला बाहेर करण्यात आलं.

स्वबळावर जिंकवू शकतो मॅच

कुलदीप यादव आता संपूर्ण टेस्ट सीरीजमध्ये पाणी देताना दिसू शकतो. त्याला कदाचित एकाही कसोटी सामन्यात संधी मिळणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध संपूर्ण टेस्ट सीरीजमध्ये कुलदीप बेंचवर बसलेला दिसू शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध संपूर्ण टेस्ट सीरीजमध्ये ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह लेफ्ट आर्म स्पिनर रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेलला संधी मिळणार आहे. कुलदीप यादव या शर्यतीत मागे पडू शकतो. कुलदीप बेंचवर बसलेला दिसेल.

रोहित दोघांना संधी देईल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटीत ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा टीम इंडियासाठी 6 व्या नंबरवर बॅटिंगला उतरु शकतो. चेंडू बरोबर बॅटनेही तो टीम इंडियासाठी कमाल करु शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटीत दिल्लीची विकेटही फिरकीपटूंना मदत करु शकते. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन दोघांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करु शकतो. तिघे वाट लावू शकतात

अक्षर पटेल-रविचंद्रन अश्विन बॉलिंग बरोबर बॅटिंगमध्येही टीम इंडियाची बाजू बळकट करतील. हे तिन्ही घातक स्पिनर्स ऑस्ट्रेलियाची वाट लावू शकतात. कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये चायनामन स्पिनर कुलदीप यादवला स्थान देणार नाही. पहिल्या कसोटीतही कुलदीपला टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं.

वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.