IND VS AUS 3rd Test : KL Rahul ने ड्रेसिंग रुममध्ये शुभमन गिलला हात मिळवला त्यावरुन इतका वाद का?
IND VS AUS 3rd Test : एवढ्याशा एका छोट्या घटनेवरुन नेटीझन्स केएल राहुलला का ट्रोल करतायत. त्यांचं म्हणणं काय आहे? भारत-ऑस्ट्रेलियात इंदोर येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे.
IND VS AUS 3rd Test : इंदोर टेस्टमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. टीम इंडियाचा पहिला डाव 109 धावात आटोपला. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल कोणाचीच बॅट चालली नाही. पुजारा, जाडेजा सर्वच फेल ठरले. शुभमन गिलवर सर्वांच लक्ष होतं. त्याला केएल राहुलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. शुभमन चांगली सुरुवात करुनही अपयशी ठरला. गिलने फक्त 21 धावा केल्या. गिल आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर एका फोटो व्हायरल झालाय. ज्यावरुन वाद सुरु आहे.
शुभमन गिल आऊट होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतला, त्यानंतर काहीवेळाने केएल राहुलने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. फॅन्सनी याच मुद्यावरुन वादंग निर्माण केला. फॅन्सनी केएल राहुलला ट्रोल करायला सुरुवात केली.
केएल राहुल टीम बाहेर
केएल राहुलला खराब फॉर्ममुळे इंदोर कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने सुमार कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हन बाहेर करण्याची मागणी सुरु होती. अखेर त्याला तिसऱ्या टेस्टमधून ड्रॉप करण्यात आलं.
Shubman Gill met KL Rahul in the dressing room. pic.twitter.com/PlQIwhIMbd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 1, 2023
इंदोर टेस्टआधी त्याला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. रोहित शर्माने उपकर्णधारपदी कोणाची निवड केली नव्हती. कारण उपकर्णधार असल्यास त्या प्लेयरला टीममध्ये खेळवणं भाग पडतं. आता केएल राहुलला प्लेइंग इलेव्हन बाहेर करण्यात आलं आहे. टेस्टमध्ये सिद्ध करणं बाकी
शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वनडे आणि टी 20 मधील परफॉर्मन्समुळे त्याला इंदोर कसोटीत संधी मिळालीय. शुभमन गिलचा टेस्ट रेकॉर्ड विशेष प्रभावी नाहीय. त्याने 14 कसोटी सामन्यात 26 डावात 31.54 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. देशांतर्गत सीरीजमध्ये शुभमन गिलची फक्त 25 सरासरी आहे. गिलला टेस्टमध्ये स्वत;ला सिद्ध करायचं आहे.