Ind vs Aus, 3rd T20 Match Live Streaming: जाणून घ्या कधी, कुठे, कशी पाहू शकता फायनल मॅच
Ind vs Aus, 3rd T20 Match Live Streaming: एका क्लिकवर जाणून घ्या भारत वि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी 20 सामन्याचे डिटेल्स.
मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 सीरीज सुरु आहे. या सीरीजमधील तिसरा सामना रविवारी 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. मोहालीमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला होता. त्यानंतर नागपूरमध्ये रोहित शर्माच्या टीमने या पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाने पलटवार केला. 6 विकेटने दुसरा टी 20 सामना जिंकला. मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. रविवारी फायनलवर सगळ्यांचे लक्ष आहे.
तयारीची चाचपणी करण्याची संधी
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी होणारी ही सीरीज दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत टीम विरुद्ध आपल्या तयारीची चाचपणी करण्याची संधी आहे.
बुमराह-हर्षलच्या कामगिरीकडे लक्ष
दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलने टीममध्ये पुनरागमन केलय. दोघेही अजून आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसलेले नाहीत. नागपूरमध्ये दुसरा टी 20 सामना पावसामुळे 8-8 षटकांचा खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 5 विकेट गमावून 90 धावा केल्या. टीम इंडियाने चार चेंडू आणि सहा विकेट राखून हा सामना जिंकला.
कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा T20 सामना कुठे खेळला जाणार? भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा T20 सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा T20 सामना कधी खेळला जाणार? भारत आणि ऑस्ट्रेलियात पहिला T20 सामना 25 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार. मॅचचा टॉस संध्याकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या T20 सामन्याचं थेट प्रसारण कुठे होणार? भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या T20 सामन्यांच लाइव्ह प्रसारण Star Sports Network च्या वेगवेगळ्या चॅनलवर केलं जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या T20 मॅचच लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या T20 मॅचच लाइव स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहू शकता.