IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेयरची इज्जत ठेवली नाही, अपमानास्पद वागणुकीनंतर पाठवलं मायदेशी

IND vs AUS Test : भारतात टेस्ट सीरीज जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने टीम निवडताना एका खेळाडूची खास करुन निवड केली होती. त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अनेक मॅच जिंकल्यात.

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेयरची इज्जत ठेवली नाही, अपमानास्पद वागणुकीनंतर पाठवलं मायदेशी
Australia TeamImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 12:37 PM

IND vs AUS Test : भारतात टेस्ट सीरीज जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने टीम निवडताना एका खेळाडूची खास करुन निवड केली होती. त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अनेक मॅच जिंकल्यात. त्याच प्लेयरला ऑस्ट्रेलियाने घरी पाठवून दिलय. ऑस्ट्रेलियाचा स्पिन-बॉलिंग ऑलराऊंडर एश्टन एगर मायदेशी निघून गेलाय. खरंतर एश्टन एगर सारख्या खेळाडूचा हा अपमान आहे. कारण या खेळाडूला टेस्ट सीरीजच्या दोन्ही सामन्यामध्ये खेळण्याची संधीच मिळाली नाही. एगरच्या जागी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टेस्टच्या आधी लेफ्ट आर्म स्पिनर कुहनमॅनला टीममध्ये स्थान दिलं. डेब्युची संधी दिली. एश्टन एगरला दिलेल्या वागणुकीवर एडम गिलख्रिस्टने सुद्धा नाराजी व्यक्त केली.

तिसऱ्या कसोटीत कोण असणार?

आता एश्टन एगरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलय. तो तिथे शेफील्ड शिल्डमध्ये खेळणार आहे. मिचेल स्वेपसन तिसऱ्या कसोटीसाठी पुनरागमन करणार आहे. कुहनमॅन आणि टॉड मर्फी संघातच रहाणार असल्याचं सांगण्यात आलय. स्वेपसनच्या घरी बाळ जन्मणार असल्याने तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. दुसऱ्या टेस्टसाठी तो टीमचा भाग नव्हता.

ऑस्ट्रेलियन टीमवर मोठा दबाव

दोन कसोटी सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीममध्ये सर्वकाही सुरळीत नाहीय. जोश हेझलवूड अनफिट असल्यामुळे टीमच्या बाहेर आहे. डेविड वॉर्नर सुद्धा कोपराला फ्रॅक्चर झाल्याने टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलाय. त्याचवेळी मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन हे ऑस्ट्रेलियाचे दोन मोठे खेळाडू दुखापतीमुळे खेळले नाहीत. ऑस्ट्रेलियासाठी या दौऱ्यात काही व्यवस्थित घडत नाहीय. ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दोन कसोटी सामन्यात एकतर्फी पराभव झालाय. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तीन दिवसात पराभव झाला. दिल्ली कसोटीतही हीच गत झाली. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाकडे पुढे जाण्याची एक चांगली संधी होती. पण त्यांना ती संधी साधता आली नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच रहाणार आहे. इंदोर येथील कसोटी सामना जिंकून हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असेल.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.