IND vs AUS Test : लाल की काळी माती? इंदोरमध्ये Ind vs Aus सामना कुठल्या मातीच्या पीचवर होणार?

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये प्रत्येक टेस्ट मॅचआधी पीचची चर्चा होते. कारण या सीरीजमध्ये पीचने महत्त्वाची भूमिका बजावलीय. या टेस्ट मॅचमध्येही पीच निर्णायक ठरेल.

IND vs AUS Test : लाल की काळी माती?  इंदोरमध्ये Ind vs Aus सामना कुठल्या मातीच्या पीचवर होणार?
ind vs aus test
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 7:51 AM

IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवारपासून तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये एकूण 4 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. सीरीजमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. इंदोर कसोटी जिंकून टीम इंडिया सीरीज जिंकण्याचा प्रयत्न करेल. इंदोर कसोटीसाठीचा पीच कसा असेल? या बद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. नागपूरमध्ये लाल मातीच्या पीचवर सामना झाला. दिल्लीमध्ये काळ्या मातीची विकेट होती. आता इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सामना लाल मातीच्या पीचवर खेळला जाणार की, काळ्या मातीच्या याची चर्चा आहे.

इंदोरचा पीच कसा आहे?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही टीम्स तिसरा कसोटी सामना लाल आणि काळ्या मातीपासून बनवलेल्या पीचवर खेळतील. लाल आणि काळ्या मातीचा पीच पाहून पाहुण्या टीमची डोकेदुखी नक्कीच वाढेल. इंदोरच्या पीचवर वरचा पृष्ठभाग लाल मातीने बनवण्यात आला आहे. त्याचवेळी खेळपट्टीच्या आत काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाची वाढली डोकेदुखी

या पीचमुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी आणखी वाढेल. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार नाहीयत. त्यामुळे आधीच त्यांची टीम अडचणीत आली आहे. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची टीम कॅप्टन पॅट कमिन्सशिवाय मैदानात उतरेल. आईची तब्येत खराब असल्याने कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला आहे. त्याच्याजागी स्टीव स्मिथ टीमच नेतृत्व करणार आहे. लाल आणि काळ्या मातीच्या पीचमध्ये फरक काय?

लाल मातीच्या पीचवर चेंडूला उसळी मिळते. अशावेळी स्लीप आणि बॅट्समनच्या जवळ असणारे फिल्डर्स प्रभावी ठरतात. त्याचवेळी काळ्या मातीच्या पीचवर स्लीपमध्ये फलंदाजांचा आऊट होणं कठीण असतं. मॅचआधी इंदोरची खेळपट्टी चर्चेत आहे. आता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया कुठल्या रणनितीसह मैदानात उतरणार त्याची उत्सुक्ता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.