IND vs AUS 3rd Test : भारताला धक्क्यावर धक्के, कुहनेमन-लियॉन जोडीने वाट लावली

IND vs AUS 3rd Test : पहिल्या तासाभरातच टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्पिन बॉलर्सनी फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलला.

IND vs AUS 3rd Test :  भारताला धक्क्यावर धक्के, कुहनेमन-लियॉन जोडीने वाट लावली
ind vs aus 3rd testImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 11:13 AM

IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या इंदोर कसोटीत टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. पहिल्या तासाभरातच टीम इंडिया संकटात सापडली आहे. भारताची टॉप ऑर्डर कोसळली आहे. टॉप फलंदाज तंबूत परतले आहेत. कसोटीच्या पहिल्याच दिवशी तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या स्पिन बॉलर्सनी फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलला. मॅथ्यू कुहनेमन आणि नाथन लियॉन यांच्या फिरकी गोलंदाजीच टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडे कुठलही उत्तर नव्हतं. धाव फलकावर 50 धावा लागण्यापूर्वीच निम्मी टीम तंबूत परतली आहे.

कॅप्टन रोहित शर्माच्या रुपाने टीम इंडियाला पहिला झटका बसला. मॅथ्यू कुहनेमन लेफ्टी स्पिन बॉलर आहे. त्याच्या गोलंदाजीवर रोहितने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या पट्टयात आला नाही. विकेटकीपर कॅरीने रोहितच स्टम्पिग करण्यात कुठलीही चूक केली नाही. सहाव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला झटका बसला. रोहितने 3 चौाकार मारले.

कुहनेमनने वाट लावली

रोहित नंतर केएल राहुलच्या जागी संधी मिळालेला शुभमन गिल बाद झाला. त्याने 3 चौकार मारले. शुभमनला कुहनेमनने कॅप्टन स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केलं. चेतेश्वर पुजारा आल्यापावली तंबूत परतला. नाथन लियॉनने त्याला बोल्ड केलं. मागच्या दोन कसोटीत दमदार कामगिरी करणारा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा आज लवकर बाद झाला. लियॉनने त्याला कुहनेमन करवी झेलबाद केलं. श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. कुहनेमनला त्याला क्लीन बोल्ड केलं. आज दोघांकडे मोठी संधी

रोहितने 23 चेंडूत (12), शुभमन गिलने 18 चेंडूत (21), चेतेश्वर पुजारा (1), रवींद्र जाडेजा 9 चेंडूत (4) आणि श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाला. 45 धावात निम्मी टीम तंबूत परतली. आता विराट कोहली आणि श्रीकर भरतची जोडी मैदानात आहे. टीमचा डाव संकटात आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये मागच्या तीन वर्षात शतक झळकवलेलं नाही. श्रीकर भरतलाही पहिल्या दोन कसोटीत संधी मिळून प्रभाव पाडता आलेला नाही. आज दोघांकडे मोठी संधी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.