IND vs AUS 1st Day LIVE Score : जाडेजाने जोडी फोडली, ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट

| Updated on: Mar 10, 2023 | 6:04 AM

India vs Australia 4th test live score: टीम इंडियाने नागपूर आणि दिल्ली टेस्ट मॅच जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटीत बाजी मारली. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे.

IND vs AUS 1st Day LIVE Score : जाडेजाने जोडी फोडली, ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट
ind vs aus 4th test

India vs Australia, 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. मॅचचा आजचा पहिला दिवस खास आहे. कारण टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान मैदानावर उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉसच्यावेळी मैदानावर दिसतील. मोदी कॉमेंट्री करणार अशीही चर्चा आहे. भारतीय टीमने या सीरीजमध्ये पहिले दोन कसोटी सामने जिंकून सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा इंदोर कसोटी सामना जिंकून सीरीजमध्ये पुनरागमन केलय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Mar 2023 12:05 AM (IST)

    चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह, माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित

    माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन.

  • 09 Mar 2023 07:54 PM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जल्लोषात सुरुवात

    मुंबई : 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जल्लोषात सुरुवात

    राज ठाकरे कार्यक्रमस्थळी दाखल

    मनसे नेते अमित ठाकरे यांचा सत्कार

  • 09 Mar 2023 03:19 PM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाला दोन धक्के

    उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथची जोडी अखेर रविंद्र जाडेजाने फोडली. ऑस्ट्रेलियाला 151 धावांवर जाडेजाने स्मिथला बाद करुन तिसरा धक्का दिला. स्मिथने 135 चेंडूत 38 धावा केल्या. त्यानंतर पीटर हँडसकॉम्बला मोहम्मद शमीने 17 रन्सवर बोल्ड केलं. 72 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाची स्थिती 174/4 अशी आहे.

  • 09 Mar 2023 02:28 PM (IST)

    IND vs AUS Live Score : टीम इंडियाच्या बॉलर्सचा संघर्ष

    62 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला असून ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 149 धावा झाल्या आहेत. उस्मान ख्वाजाने अर्धशतक पूर्ण केलय. तो 65 धावांवर खेळतोय. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावांवर आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष सुरु आहे.

  • 09 Mar 2023 01:11 PM (IST)

    IND vs AUS Live Score : लाबुशेनच्या दांड्या गुल करणारा Mohammed Shami चा कडक इनस्विंग एकदा पहा VIDEO

    IND vs AUS Test : मार्नस लाबुशेन फक्त बॅट फिरवत राहिला. एकदा VIDEO बघा.

  • 09 Mar 2023 01:09 PM (IST)

    IND vs AUS Live Score : ख्वाजा-स्मिथची जोडी जमली

    उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथची जोडी जमली आहे. ख्वाजा (48) आणि स्मिथ (16) धावांवर खेळतोय. ऑस्ट्रेलियाने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 46 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 110 धावा झाल्या आहेत.

  • 09 Mar 2023 12:27 PM (IST)

    IND vs AUS Live Score : लंचनंतर खेळाला सुरुवात

    लंचनंतर खेळाला सुरुवात झाली आहे. 33 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 88 धावा झाल्या आहेत. उस्मान ख्वाजा (39) आणि स्टीव्ह स्मिथ (3) धावांवर खेळतोय.

  • 09 Mar 2023 11:41 AM (IST)

    IND vs AUS Live Score : KS Bharat संधी मिळून पण माती करतोय, पहा किती बालिश चूक केली, VIDEO

    KS Bharat च्या या चुकीमुळे सगळ्या टीमला शॉक बसला. वाचा सविस्तर…..

  • 09 Mar 2023 11:39 AM (IST)

    IND vs AUS Live Score : लंचला खेळ थांबला

    लंचला खेळ थांबला असून ऑस्ट्रेलियाच्या 29 ओव्हर्समध्ये 75/2 धावा झाल्या आहेत. उस्मान ख्वाजा (27) आणि स्टीव्ह स्मिथ (2) धावांवर खेळतोय.

  • 09 Mar 2023 11:09 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट

    मार्नस लाबुशेनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली आहे. मोहम्मद शमीने त्याला 3 धावांवर क्लीन बोल्ड केलं. 22.3 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाची 73/2 अशी स्थिती आहे. उस्मान ख्वाजा (23) आणि स्टीव्ह स्मिथची (1) जोडी मैदानात आहे.

  • 09 Mar 2023 10:47 AM (IST)

    IND vs AUS Live Score : अश्विनने मिळवून दिलं यश

    ऑस्ट्रेलियाला 61 रन्सवर पहिला झटका बसला आहे. दमदार फलंदाजी करणारा ट्रेव्हिस हेड आऊट झाला. अश्विनने त्याला जाडेजाकरवी कॅचआऊट केलं. हेडने 44 चेंडूत 32 धावा करताना 7 चौकार मारले. आता उस्मान ख्वाजा आणि लाबुशेनची जोडी मैदानात आहे.

  • 09 Mar 2023 10:28 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात

    ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. 13 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 52 धावा झाल्या आहेत. सलामीवीर ट्रेव्हीस हेड 31 आणि उस्मान ख्वाजाची 10 जोडी मैदानात आहे.

  • 09 Mar 2023 09:58 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाची संयमी सुरुवात

    6 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनाबाद 23 धावा झाल्या आहेत. ट्रेव्हीस हेड (7) आणि उस्मान ख्वाजा (5) ही सलामीवीराची जोडी मैदानात आहे.

  • 09 Mar 2023 09:45 AM (IST)

    IND vs AUS Live Score : 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    3 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 15 धावा झाल्या आहेत. ट्रेव्हीस हेड आणि उस्मान ख्वाजा या सलामीवीराची जोडी मैदानात आहे.

  • 09 Mar 2023 09:38 AM (IST)

    IND vs AUS Live Score : रोहित आणि स्मिथला दिली विशेष कॅप

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्टीव्ह स्मिथला एक खास कॅप भेट दिली.

  • 09 Mar 2023 09:26 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI

    ऑस्ट्रेलिया: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरुन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन

  • 09 Mar 2023 09:24 AM (IST)

    IND vs AUS Live Score : टीम इंडियाची प्लेइंग XI

    भारत : रोहित शर्मा ( कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव

  • 09 Mar 2023 09:12 AM (IST)

    IND vs AUS Live Score : एका खास नाण्याचा वापर

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मैत्रीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून एका खास नाण्याचा वापर करण्यात आला.

  • 09 Mar 2023 09:07 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस

    भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकला आहे. त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

  • 09 Mar 2023 09:04 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत ‘रथयात्रा’

    भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान येणार असल्याने एका खास रथ बनवण्यात आला होता. त्यामधून पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी संपूर्ण स्टेडियमला एक फेरी मारली व उपस्थित प्रेक्षकांना हात उंचावून अभिवानद केलं.

  • 09 Mar 2023 08:59 AM (IST)

    IND vs AUS Live Score : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच जोरदार स्वागत

    ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन स्टेडियममध्ये त्यांच स्वागत केलं.

  • 09 Mar 2023 08:54 AM (IST)

    IND vs AUS Live Score : भारताला विजय आवश्यक

    ऑस्ट्रेलियन टीमने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.

  • 09 Mar 2023 08:44 AM (IST)

    IND vs AUS Live Score : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींच स्वागत केलं.

Published On - Mar 09,2023 8:41 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.