Ravindra jadeja ड्रेसिंग रुममध्ये कोणाशीच बोलला नाही, प्लेयर ऑफ द सीरीज बनूनही हताश
IND vs AUS : काय झालं रवींद्र जाडेजाच? टेस्ट मॅच संपल्यानंतर तो कोणाशीच का बोलला नाही?. टीम इंडियाने दोनवेळा मायदेशात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे, दोनवेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात जाऊन पराभवाच पाणी पाजलय.
IND vs AUS Test : टीम इंडियाने अखेर मायदेशात झालेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. अहमदाबादमध्ये खेळला गेलेला चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाने ही सीरीज 2-1 ने जिंकली. टीम इंडियाने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. टीम इंडियाने दोनवेळा मायदेशात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे, दोनवेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात जाऊन पराभवाच पाणी पाजलय. विद्यमान सीरीजमध्ये टीम इंडियाच्या विजयाचे दोन हिरो ठरले. रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनला प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड मिळाला. दोन्ही खेळाडूंनी बॅट आणि बॉलने महत्त्वपूर्ण योगदान दिलय. मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळूनही रवींद्र जाडेजा निराश होता.
रवींद्र जाडेजा स्वत:च्या फलंदाजीवर नाराज होता. अहमदाबाद टेस्टमध्ये आऊट झाल्यानंतर जाडेजा ड्रेसिंग रुममध्ये एकटा बसला होता, अश्विनने या बद्दल माहिती दिली. प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाल्यानंतर रवींद्र जाडेजा म्हणाला की, “मी माझ्या फलंदाजीवर समाधानी नाहीय. या सीरीजमध्ये काही प्रसंगी मी चुकलो. खासकरुन या मॅचमध्ये. मी अजून मेहनत करीन आणि पुढच्या सीरीजमध्ये फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करेन”
ड्रेसिंग रुममध्ये कोणाशीच बोलला नाही
आर.अश्विननेही सांगितलं की, “अहमदाबाद टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये आऊट झाल्यानंतर रवींद्र जाडेजा निराश होता” आऊट झाल्यानंतर मी पाहिलं, जाडेजा एकतास एकटा बसून होता. आऊट झाल्यामुळे तो किती निराश झालाय, त्या बद्दल त्याने मला सांगितलं.
जडेजा-अश्विनचा जलवा
चालू टेस्ट सीरीजमध्ये रवींद्र जाडेजाने 22 विकेट काढल्या. त्याशिवाय 135 धावा केल्या. अश्विनने एकूण 25 विकेट काढले. त्याशिवाय 86 रन्सच योगदान दिलं. 2011 साली भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन टेस्ट मॅचची सीरीज झाली, त्यावेळी सुद्धा हेच दोन खेळाडू प्लेयर ऑफ द सीरीज बनले होते.
2013 मध्ये अश्विन 29 विकेट घेऊन प्लेयर ऑफ द सीरीज
2017 मध्ये रवींद्र जडेजा 25 विकेट घेऊन प्लेयर ऑफ द सीरीज
2023 मध्ये अश्विन आणि जडेजा दोघे जॉइंट प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचे मानकरी