IND vs AUS Test : KS Bharat संधी मिळून पण माती करतोय, पहा किती बालिश चूक केली, VIDEO
IND vs AUS Test : KS Bharat च्या या चुकीमुळे सगळ्या टीमला शॉक बसला. या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माच्या डोळ्यासमोर अशी एक घटना घडली, ज्यावर विश्वास बसणार नाही.
IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथे सुरु आहे. या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माच्या डोळ्यासमोर अशी एक घटना घडली, ज्यावर विश्वास बसणार नाही. टीम इंडियाचा विकेटकीपर केएस भरतने ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रेविह हेडची सोपी कॅच सोडली. या कॅच सोडण्याला दुर्घटना म्हटलं जाईल, कारण ही खूपच सोपी कॅच होती. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 6 व्या ओव्हरमध्ये उमेश यादवचा एक अप्रतिम चेंडू हेडला समजलाच नाही. चेंडू बॅटच्या कडेला लागून मागे विकेटकीपरकडे गेला. केएस भरतसाठी ही खूप सोपी कॅच होती. पण त्याला ती पकडता आली नाही.
केएस भरतने ही कॅच सोडल्यानंतर त्यालाही विश्वास बसला नाही. तो ही हैराण झाला. स्वत:वरच त्याला हसायला आलं. दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि दुसऱ्या खेळाडूंना ही कॅच सुटलीय, यावर विश्वास बसला नाही.
केएस भरतकडून अनेक चूका
केएस भरतने फक्त कॅचच सोडली नाही. त्याने दोन बायचे चौकारही सोडले. मोहम्मद शमीचे चेंडू खूप स्विंग होत होते. हे चेंडू पकडणं खूप कठीण होतं. भारतच्या विकेटकीपिंगमध्ये एकाग्रता दिसत नव्हती.
KS bharat drop here. You can see he takes a step to the legside. (Second photo) So already he is unbalanced, and then he doesn’t quiet get to the ball, he reaches out (last photo) very tough to take a opposite step then come back in. Technical error #INDvsAUSTest #INDvAUS pic.twitter.com/7pwSdIPUKu
— lucas (@LucasR32sky) March 9, 2023
जीवनदानाचा फायदा नाही उचलता आला
ट्रेविस हेडला जीवदान मिळालं. पण तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. हेडने 32 धावांवर आपली विकेट गमावली. अश्विनच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. हेडने कॅच सुटल्यानतंर आणखी 25 धावा केल्या. कदाचित याच 25 धावा पुढे जाऊन टेस्ट मॅचमध्ये निर्णायक ठरु शकतात. फलंदाजीवर प्रश्नचिन्ह
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतला भारताच्या टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. तो सीरीजचे चारही टेस्ट मॅच खेळला. पण त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. या खेळाडूने 5 इनिंगमध्ये 14.25 च्या सरासरीने 57 धावा केल्या आहेत.