IND vs AUS Test : एकट्या केएल राहुलच्या डोक्यावर टांगती तलवार नाही, ‘या’ खेळाडूवर सुद्धा तितकाच दबाव

खरंतर अशावेळी कुठला वादविवाद अपेक्षित नाही. पण जिंकूनही टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वरुन वाद आहेत. याच कारण आहे केएल राहुल. या एका खेळाडूच्या निवडीवरुन सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी, माजी क्रिकेटपटूंमध्ये दोन गट पडले आहेत.

IND vs AUS Test : एकट्या केएल राहुलच्या डोक्यावर टांगती तलवार नाही, 'या' खेळाडूवर सुद्धा तितकाच दबाव
KL Rahul
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:58 AM

इंदोर : टीम इंडियाने दोन्ही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवला. नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटी तीन दिवसात निकाली काढली. टीम इंडियाने दिग्गज ऑस्ट्रेलियन टीमवर वर्चस्व गाजवलं. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. खरंतर अशावेळी कुठला वादविवाद अपेक्षित नाही. पण जिंकूनही टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वरुन वाद आहेत. याच कारण आहे केएल राहुल. या एका खेळाडूच्या निवडीवरुन सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी, माजी क्रिकेटपटूंमध्ये दोन गट पडले आहेत. कारण केएल राहुलला बऱ्याच संधी दिल्या. पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला टीममधून ड्रॉप करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

केएल राहुलमुळे शुभमन गिलसारख्या चांगल्या प्लेयरवर अन्याय होतो, अशी भावना आहे. कारण गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पण केएल राहुलला संधी द्यायची म्हणून गिलला बाहेर बसवलं जातय. याआधी केएल राहुलला बऱ्याच संधी देऊन झाल्यात. त्यामुळे त्याला टीममधून वगळा असाच सूर आहे.

ती त्याच्यासाठी शेवटची संधी असेल

इंदोर कसोटीत केएल राहुच्या निवडीवर टांगती तलवार असेल. नागपूर आणि दिल्ली कसोटीतील कामगिरी लक्षात घेता त्याची इंदोर टेस्टसाठी टीममध्ये निवड होणं कठीण आहे. केएल राहुलची निवड झालीच, तरी ती त्याच्यासाठी शेवटची संधी असेल.

तो कधी शतक झळकवणार

सध्या फक्त केएल राहुलच्या खराब फॉर्मची चर्चा आहे. पण तो एकटाच नाहीय. इंदोरमध्ये फक्त एकट्या केएल राहुलवर दबाव नसेल. त्याच्याशिवाय आणखी एका भारतीय प्लेयरवर परफॉर्म करण्याचा दबाव असेल. ते नाव आहे विराट कोहली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून शतक झळकवलेलं नाही.

सरासरी फक्त 27

विराट कोहली क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये संघर्ष करताना दिसतोय. मागच्या 8 टेस्ट मॅचमध्ये त्याने 26.23 च्या सरासरीने 341 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने फक्त एक अर्धशतक झळकवलय.. मागच्या 3 वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये विराटची बॅटिंग सरासरी फक्त 27 ची आहे. त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होतायत

त्यामुळे इंदोर टेस्ट केएल राहुल इतकीच विराट कोहलीसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. विराट कोहलीला सुद्धा परफॉर्म करावं लागेल. कारण आता केएल राहुलप्रमाणे त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होतायत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.