IND vs AUS : चेन्नईत पराभवाला मनाई आहे, सीरीजच नाही, सत्ताही धोक्यात
IND vs AUS : थेट सत्तेला धोका निर्माण झालाय, त्यामुळे आता पराभवाला मनाई आहे. विजेत्याचा निर्णय चेन्नई वनडेमध्ये होणार आहे. तिसरा सामना बुधवारी खेळला जाईल.
IND vs AUS : मुंबईमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर विशाखापट्टनममध्ये ऑस्ट्रेलियाने पलटवार केला. वनडे सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. विजेत्याचा निर्णय चेन्नई वनडेमध्ये होणार आहे. तिसरा सामना बुधवारी खेळला जाईल. ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीम्स आपली ताकत पणाला लावतील. चेन्नईमध्ये फक्त वनडे सीरीजच्या विजेत्याचा निर्णय होणार नाही. वनडे फॉर्मेटमध्ये आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 टीम कोण? ते सुद्धा ठरणार आहे.
सध्या टीम इंडिया नंबर 1 वनडे टीम आहे. चेन्नईमध्ये पराभव झाल्यास टीम इंडियाला नंबर 1 स्थान गमवाव लागेल. चेन्नईमध्ये हरल्यास टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्सचे 113-113 रेटिंग पॉइंट्स होतील. कांगारु टॉपवर असतील. कारण पॉइंटच्या फरकाने ते पुढे असतील. भारताला आपलं नंबर 1 स्थान टिकवायच असेल, तर त्यांना चेन्नईत जिंकावच लागेल.
ऑस्ट्रेलियाच होईल मोठं नुकसान
टीम इंडिया चेन्नईमध्ये जिंकल्यास त्यांचे रेटिंग पॉइंट्स 115 होतील. त्याच बरोबर ते नंबर 1 वर राहतील. ऑस्ट्रेलियाच्या क्रमवारीत 2 स्थानाची घसरण होऊन ते चौथ्या नंबरवर जातील. अशा स्थितीत न्यूझीलंड दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या नंबरवर पोहोचेल.
दोघांमुळे सीरीज रोमांचक
दोन्ही टीम्स चेन्नईमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. कारण सीरीजशिवाय रँकिंगही महत्त्वाची आहे. मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्शने सीरीज रोमांचक बनवली आहे. दोघे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो आहेत. विशाखापट्टनममध्ये हरणारी टीम इंडिया चेन्नईत पुनरागमन करणार का? त्याची उत्सुक्ता आहे. चेन्नईची विकेट कशी असेल?
चेन्नईमध्ये टीम इंडिया पुनरागमन करणार का? चेन्नईच्या विकेटवर टीम इंडियाला जास्त मदत मिळू शकते. कारण चेन्नईच्या विकेटवर स्पिनर्सचा बोलबोला असतो. मागच्या दोन सामन्यात वेगवान गोलंदाजांना अनुकूल विकेट होती. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही टीम्सना झाला. भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. चेन्नईत स्पिन फ्रेंडली विकेट असेल, तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या अडचणी वाढतील. शेवटच्या वनडेमध्ये क्रिकेट चाहत्यांना चांगलं क्रिकेट पहायला मिळेल.