IND vs AUS: नागपूरचा पीच सुकवण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर? ‘गडगंज श्रीमंत BCCI ला लाज वाटत नाही का?’
IND vs AUS: हेयर ड्रायर वापराचे फोटो शेयर करुन, चाहत्यांनी बीसीसीआयची लाज काढली
मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T20 सीरीज सुरु आहे. या सीरीजमधील दुसरा टी 20 सामना नागपूरमध्ये खेळला गेला. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी फक्त 8 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. पावसामुळे मैदान मोठ्या प्रमाणात ओलं झालं होतं. त्यामुळे मॅच उशिराने सुरु झाली. मैदान सुकवण्याची योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे बीसीसीआयला मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आले. चाहत्यांनी बीसीसीआयला भरपूर सुनावलं.
कुठल्या स्टेडियमवर झाली मॅच?
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर ही मॅच होती. यावेळी मैदान सुकवण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करण्यात आल्याचे फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
मॅचला जास्त विलंब झाला, त्यावेळी अंपायर केएन अनंता पद्मानाभन आणि नितिन मेनन यांनी मुरली कार्तिक बरोबर चर्चा केली. सामना 8-8 षटकांचा खेळवणार असल्याचं सांगितलं. टॉस 9.15 ऐवजी 9.30 वाजता झाला. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये दोन षटकांचा पावरप्ले होता.
बीसीसीआय मोठ्या प्रमाणात ट्रोल
चाहते 20 ओव्हर्सची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. तिकीटासाठी त्यांनी पैसे मोजले होते. अशावेळी सामन्याला विलंब झाल्याने चाहत्यांच रागवणं स्वाभाविक आहे. यूजर्सनी अनेक फोटो शेयर करुन बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं.
हेयर ड्रायरच्या फोटोमागचं सत्य काय?
यूजर्सनी हेयर ड्रायरचा जो फोटो शेयर केलाय, तो 2020 सालचा भारत-श्रीलंकेमधील गुवाहाटीच्या सामन्याचा आहे. त्यावेळी दोन्ही टीम्समध्ये टी 20 सामना खेळला गेला होता. बरसापारा स्टेडियमवर हेयर ड्रायरचा वापर करुन पीच सुकवण्यात आला होता.
World richest Board ?#INDvsAUST20I pic.twitter.com/90Gz00cxWr
— Shaziyaa (@ShazziyaM) September 23, 2022
थोडी तरी लाज वाटू दे
“थोडी तरी लाज वाटू दे बीसीसीआय. मैदानावरुन पाणी काढण्याची चांगली व्यवस्था तुमच्याकडे नाही. सगळे पैसे कुठे खर्च होतात? असा सवाल एका युजरने केला होता.
Have some shame @BCCI ! What use of that money when you don’t have proper drainage system, where does all the money go? this match is cancelled this is just covered up job.#INDvsAUST20I pic.twitter.com/gpmkbUkmiL
— SAMSONITE? (@thesuperroyal) September 23, 2022
कोणी जिंकली मॅच?
नागपूरच्या या दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने 4 चेंडू आणि 6 विकेट राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग केली. त्याने 8 ओव्हरमध्ये 5 बाद 90 धावा केल्या. टीम इंडियाने रोहित शर्माच्या 46 धावांच्या बळावर 7.2 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं.