Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : कोहलीची 8 वेळा शिकार, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका

IND vs AUS : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन टीममधील 5 प्लेयरपासून जास्त सावध रहाव लागेल. हे पाच खेळाडू खूप धोकादायक आहेत. टेस्ट सीरीजनंतर आजपासून वनडे मालिका सुरु होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना होत आहे.

IND vs AUS : कोहलीची 8 वेळा शिकार, ऑस्ट्रेलियाच्या 'या' 5 खेळाडूंपासून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका
Virat kohliImage Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:19 AM

Ind vs Aus Odi Series : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये शुक्रवारपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. टीम इंडियाकडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने तयारीची चाचपणी करण्याची एक चांगली संधी आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आज हार्दिक पंड्या पहिल्या वनडेमध्ये नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियापासून 5 धोके आहेत. हार्दिक पंड्या त्यांचा सामना करण्यासाठी काय रणनिती आखणार? त्याची उत्सुक्ता आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ पाच प्लेयरपासून टीम इंडियाला सावध रहाव लागणार आहे.

विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात तो 186 धावांची इनिंग खेळला. आता वनडे सीरीजमध्ये त्याच्यासमोर त्याचा सर्वात मोठा विरोधी असेल.

  1. एडम जम्पा विराट कोहलीचा सर्वात मोठा विरोधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जम्पाने कोहलीला सर्वाधिक 8 वेळा आऊट केलय. वनडेमध्ये 5 आणि टी 20 मध्ये 3 वेळा कोहलीला बाद केलय. कोहली जम्पाच्या गोलंदाजीचा कसा सामना करणार? त्याची उत्सुक्ता आहे.
  2. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियाच नेतृत्व आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने मागच्या दोन कसोटी सामन्यात कमाल केली. इंदोर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. अहमदाबाद टेस्ट मॅच ड्रॉ झाली. 2017 साली स्मिथने भारतात ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीमच नेतृत्व केलं होतं.
  3. डेविड वॉर्नरपासूनही टीम इंडियाया या सीरीजमध्ये आव्हान मिळू शकतं. त्याने भारतात 8 वनडे मॅचमध्ये त्याने 55.85 च्या सरासरीने 391 धावा ठोकल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा थोडा कमी 96.67 आहे. भारताविरुद्ध त्याने 3 सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत.
  4. ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीन आतापर्यंत भारताविरुद्ध फक्त एक वनडे सामना खेळलाय. पण अन्य फॉर्मेटमध्ये त्याचा भारताविरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो टीम इंडियाच टेन्शन वाढवू शकतो. भारताविरुद्ध तो 10 सामने खेळलाय. यात त्याने 510 धावा फटकावल्या आहेत. त्याने फक्त 1 विकेट काढला. पण 8 कॅच पकडून कमालीची फिल्डिंग केली. मागच्यावर्षी हैदराबादमध्ये टी 20 सामन्यात त्याने भारताविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
  5. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन ट्रेविस हेडला सुद्धा रोखण्याच भारतासमोर आव्हान असेल. तो शानदार फॉर्ममध्ये आहे. अहमदाबाद टेस्टमध्ये त्याने 90 धावांची खेळी केली. याआधी इंदोर कसोटीत क्रीजवर टीकून नाबाद 49 धावा फटकावून टीमला विजय मिळवून दिला. भारताविरुद्ध तो 5 वनडे सामने खेळलाय. यात 119 धावा केल्या आहेत.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.