IND vs AUS : सूर्यकुमारबाबत दिनेश कार्तिकचा मोलाचा सल्ला, फलंदाजीच्या क्रमवारीत सुचवला बदल
IND vs AUS ODI Series : टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर आक्रमक फलंदाज दिनेश कार्तिकने आता सूर्यकुमार यादव संदर्भात एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. त्याने सूर्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची मागणी केली आहे.
IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरीजनंतर आता वनडे सीरीज सुरु आहे. वनडे सीरीजमधील शेवटचा सामना बाकी आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच आहे. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. खासकरुन भारतीय फलंदाजांची फ्लॉप कामगिरी चिंतेचा विषय आहे. पहिल्या वनडे मॅचमध्येही फलंदाजांचा परफॉर्मन्स लौकीकाला साजेसा नव्हता. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यासमोर फलंदाजीचा मुख्य प्रश्न आहे.
टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर आक्रमक फलंदाज दिनेश कार्तिकने आता सूर्यकुमार यादव संदर्भात एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. त्याने सूर्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची मागणी केली आहे. सूर्यकुमार यादव या सीरीजमध्ये फ्लॉप ठरलाय.
दिनेश कार्तिकच्या मते सूर्याला कितव्या नंबरवर पाठवावं?
आधी टेस्ट सीरीजमध्ये त्याला संधी मिळाली. त्यानंतर पहिल्या दोन वनडे मॅचमध्ये संधी मिळूनही सूर्याला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या क्रमावारीत बदल करावा, असं दिनेश कार्तिकने सुचवलय. सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवावं, असं दिनेश कार्तिकच मत आहे. सूर्यकुमार यादव दोन वनडे सामने खेळलाय. याआधी तो सलग वनडे सामने खेळत नव्हता. श्रेयस अय्यर चौथ्या नंबरवर पसंतीचा खेळाडू आहे. सूर्यकुमार बॅकअप होता, असं दिनेश कार्तिकने क्रिकबजशी बोलताना सांगितलं.
सूर्यकुमारने मागच्या 9 इनिंगमध्ये किती धावा केल्या?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने झाले आहेत. मुंबई आणि विशाखापट्टनम वनडेमध्ये सूर्यकुमारला लेफ्टी वेगवान बॉलर मिशेल स्टार्कने आपल्या इनस्विंगवर LBW आऊट केलं. वनडेच्या मागच्या 9 इनिंगमध्ये सूर्यकुमारने फक्त 110 धावा केल्या आहेत. त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. त्यामुळे टी 20 क्रिकेटमधील हा यशस्वी फलंदाज वनडे, टेस्टमध्ये यशस्वी ठरेल का? हा प्रश्न निर्माण झाालय. कमी ओव्हर्समध्ये सूर्या जास्त घातक
“जेव्हा तुम्ही सूर्यासमोर कमी षटक ठेवता, 14 ते 18 ओव्हर दरम्यान तो घातक फलंदाजी दाखवू शकतो. ही एक अशी गोष्ट आहे, ज्या बद्दल टीम इंडिया आणि राहुल द्रविड विचार करु शकतात. तो टी 20 मध्येही दोन चेंडूत बाद होतो” असं दिनेश कार्तिक म्हणाला. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना बुधवारी होणार आहे. दोन्ही टीम्स सध्या 1-1 अशा बरोबरीत आहेत.