IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया बरोबर जुना हिशोब चुकता करणार? असं आहे ODI सीरीजच Full Schedule
India vs Australia ODI series: याआधी भारत-ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचा वनडे सामना कधी झाला होता? भारत-ऑस्ट्रेलियामध्ये किती वनडे मॅचेस होणार आहेत? जाणून घ्या सर्वकाही.
IND vs AUS ODI Series : टेस्ट सीरीजनंतर भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या एका दुसऱ्या फॉर्मेटमध्ये आमने-सामने येणार आहेत. व्हाइट बॉल आणि निळ्या, पिवळ्या जर्सीमध्ये दोन्ही टीम्स वनडे सीरीजमध्ये भिडणार आहेत. टेस्ट सीरीजनंतर आता वनडे क्रिकेटचा स्पीड क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार आहे. टेस्ट सीरीजची सुरुवात वेगवान झाली होती. पहिले तीन कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये वेग मंदावला. आता वनडे सीरीज रोमांचक व्हावी, हीच क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 17 मार्चपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन वर्षापेक्षा जास्त काळानंतर वनडे फॉर्मेटमध्ये आमने-सामने येतील. दोन्ही टीम्समध्ये शेवटचा वनडे सामना मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात झाला होता. 2020 च्या अखेरीस नोव्हेंबरमध्ये भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरीज झाली होती. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली होती.
पहिल्या वनडेत भारताच नेतृत्व रोहित शर्मा नाही करणार
भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही टीम्समध्ये होणारी वनडे सीरीज महत्त्वाची आहे. भारतीय टीम सीरीजच्या पहिल्या सामन्यात नियमित कॅप्टन रोहित शर्माशिवाय उतरणार आहे. व्यक्तीगत कारणांमुळे रोहित शर्मा सुट्टीवर आहे.
ऑस्ट्रेलियाच नेतृत्व कोण करणार?
दुसऱ्या मॅचपासून तो उपलब्ध असेल. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या टीमच नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियन टीम सुद्धा आपला नियमित कॅप्टन पॅट कमिन्सशिवाय उतरेल. आईच्या निधनामुळे पॅट कमिन्स वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय. त्याच्याजागी स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन टीमच नेतृत्व करेल.
IND vs AUS: ODI सीरीज कार्यक्रम
17 मार्च – पहिली ODI, वानखेडे स्टेडियम, मुंबई
19 मार्च – दूसरी ODI, वायएस राजा रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टनम
22 मार्च – तीसरी ODI, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
IND vs AUS: दोन्ही टीम्सचे स्क्वॉड
भारतः रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट. ऑस्ट्रेलियाः स्टीव स्मिथ (कॅप्टन), शॉन एबट, एश्टन ऐगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वॉर्नर आणि एडम झम्पा.