IND vs AUS : रोहितच्या कॅप्टनशिपमध्ये ‘या’ खेळाडूच्या करिअरची वाट लागलीय, फक्त बाहुलं बनून राहिलाय

IND vs AUS : एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला रोहित शर्मा सातत्याने संधी नाकारतोय. या खेळाडूवर एकप्रकारचा अन्याय होतोय. त्याला संधी नाकारुन टीम इंडियाच नुकसान होतोय. बीसीसीआयने त्याला संधी दिली पाहिजे.

IND vs AUS : रोहितच्या कॅप्टनशिपमध्ये 'या' खेळाडूच्या करिअरची वाट लागलीय, फक्त बाहुलं बनून राहिलाय
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:45 PM

India vs Australia 2023 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु आहे. मुंबईतील पहिला वनडे सामना टीम इंडियाने जिंकला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव झाला. टीम इंडियाच्या मधल्याफळीची वाईट स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या घातक बॉलिंगसमोर टीम इंडियाची मीडल ऑर्डर कोसळतेय. टीम इंडिया बॅकफूटवर आहे. पण, तरीही कॅप्टन रोहित शर्मा एका धोकादायक खेळाडूला संधी देत नाहीय. हा खेळाडू स्वबळावर टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात या खेळाडूच करिअर संपताना दिसतय.

टीम इंडियाच्या एक खेळाडू बरोबर कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड सावत्र मुलासारखा व्यवहार करतायत. या खेळाडूला टीम इंडियात स्थान मिळत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतायत. सिलेक्टर्सनी या खेळाडूला विचारल सुद्धा नाही. संजू सॅमसन विकेटकीपिंगसह आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजसाठी त्याच्या नावाचा विचार झालेला नाही.

8 वर्षात फक्त 28 आंतरराष्ट्रीय मॅच

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये खेळत नाहीय. अशावेळी BCCI ने श्रेयस अय़्यरच्या जागी संजू सॅमसनची निवड केली नाही. ही मोठी चूक आहे. सॅमसनसारख्या प्रतिभावान खेळाडूकडे सिलेक्टर्सनी पुन्हा दर्लक्ष केलय. संजू सॅमसनला प्रत्येकवेळी टीम इंडियातून बाहेर बसाव लागतय. संजू सॅमसन मागच्या 8 वर्षात भारताकडून फक्त 28 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. संजू सॅमसनच भारतीय संघात सतत आत-बाहेर सुरु आहे.

बीसीसीआयच्या हातच बाहुलं

संजू सॅमसनला सतत बाहेर ठेवायच आणि एक-दोन सामन्यात त्याला संधी देऊन त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करायची, हा त्या खेळाडूवर अन्याय आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे त्या खेळाडूच सुद्धा नुकसान होतं. त्यामुळेच कदाचित सॅमसन आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्लॉप होतो. कारण इंटरनॅशनल टीम विरुद्ध त्याला जास्त खेळण्याची संधी मिळत नाही. 28 वर्षीय सॅमसनकडे सातत्याने दुर्लक्ष झालय. संजू बीसीसीआयच्या हातच बाहुल बनून राहिलाय असं दिसतं.

करिअरची सुरुवात कधी झाली?

संजू सॅमसनने भारतासाठी वर्ष 2015 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून तो सतत आत-बाहेर होतोय. संजू सॅमसनपेक्षा इशान किशनला जास्त संधी दिली जातेय. पण त्याला अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. इशान किशनची डबल सेंच्युरी सोडल्यास, मागच्या 11 इनिंगमध्ये टीम इंडियासाठी त्याने एकही अर्धशतक झळकवलेलं नाही. न्यूझीलंड विरुद्ध जानेवारी 2023 मध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज झाली. त्यावेळी इशान एकाही मॅचमध्ये दोन आकडी धावा करु शकला नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.