IND vs AUS: LIVE मॅचमध्ये रवी शास्त्रींनी टीम इंडियाची उतरवली, फिल्डिंगला म्हटलं….
टीम इंडियाचा खेळ पाहून रवी शास्त्री स्वत:ला रोखू शकले नाहीत...
मुंबई: टीम इंडियाने पहिल्या टी 20 मॅचमध्ये दमदार फलंदाजी केली. त्यांनी 209 धावांच ऑस्ट्रेलियाला मोठं लक्ष्य दिलं होतं. पण तरीही टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. रोहित शर्माची टीम तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर पडली आहे. खराब गोलंदाजी आणि दर्जाहीन फिल्डिंग ही टीम इंडियाच्या पराभवाची दोन मुख्य कारणं आहेत. टीम इंडियाने या मॅचमध्ये पहिली फलंदाजी केली.
त्यामुळे टीम इंडियाने सामना गमावला
पाहुण्या ऑस्ट्रेलियाने 4 चेंडू आणि 4 विकेट राखून विजय मिळवला. अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि केएल राहुलने खराब फलंदाजी केली. त्यांनी सोप्या कॅच सोडल्या. त्यामुळे भारताला सामना गमवावा लागला.
दर्जाहीन फिल्डिंगवर जोरदार टीका
अक्षरने कॅमरुन ग्रीन, राहुलने स्टीव्ह स्मिथ आणि हर्षलने मॅथ्यू वेडची कॅच सोडली. टीम इंडियाच्या दर्जाहीन फिल्डिंगवर जोरदार टीका सुरु आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री ही फिल्डिंग पाहून प्रचंड संतापले. ऑन एयर ते स्वत:ला रोखू शकले नाहीत.
फिल्डिंग कमकुवत दिसली
मागच्या काही वर्षातील टीम इंडियाकडे पाहिलं, तर युवा आणि अनुभवी खेळाडूंच मिश्रण आहे. पण मला तर युवा खेळाडू गायब दिसतायत. त्यामुळेच फिल्डिंग कमकुवत दिसली.
कुठे गेला तुमचा एक्स फॅक्टर?
टीम इंडियाची फिल्डिंग टॉप टीम्सच्या तोडीची वाटत नाही. याच कमजोरीमुळे मोठ्या टुर्नामेंटमध्ये नुकसान होऊ शकतं. हे फलंदाजी करणाऱ्या टीमला 15-20 रन्स अतिरिक्त मिळण्यासारख आहे. फिल्डिंग पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, कुठे आहे टॅलेंट? इथे रवींद्र जाडेजा नाहीय. कुठे गेला तुमचा एक्स फॅक्टर?