IND vs AUS: ‘आजकाल लोकांकडे भरपूर फालतू…’ Bhuvneshwar Kumar ची बायको जाम भडकली

सगळेच नवऱ्याला बोलत असल्याने नूपुरने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला, तिने काय म्हटलय ते वाचा

IND vs AUS: 'आजकाल लोकांकडे भरपूर फालतू...' Bhuvneshwar Kumar ची बायको जाम भडकली
nupur-nagarImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 4:31 PM

मुंबई: भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आहे. पण सध्या तो टीकाकार आणि ट्रोलर्सच्या रडारवर आहे. आशिया कप पाठोपाठ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार महागडा गोलंदाज ठरला. सलग तीन मॅचेसमध्ये भुवनेश्वरने 19 व्या ओव्हरमध्ये बऱ्याच धावा दिल्या आहेत. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. चांगली धावसंख्या उभारुनही टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे भुवनेश्वरला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

फक्त चाहतेच नाही, तर माजी क्रिकेटपटूही भुवनेश्वर कुमारवर सातत्याने टीका करत आहेत. भुवनेश्वरकुमारकडे 19 व्या ओव्हरमध्ये चेंडू सोपवणं वास्तविक चिंतेचा विषय आहे, असं प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा म्हटलय. T20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना भुवनेश्वर गोलंदाजीमध्ये मार खातोय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संताप आहे.

बायको पुढे आली

भुवनेश्वरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. 19 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरच्या हाती चेंडू सोपवण्याची मीम्सच्या माध्यमातून खिल्ली उडवली जात आहे. या सगळ्या परिस्थितीत भुवनेश्वरची बाजू घेण्यासाठी त्याची पत्नी नूपुर नागर पुढे सरसावली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या मनातला राग व्यक्त केला आहे.

नुपूरने काय लिहिलय?

तिने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तुमचं काम करा, असं तिने म्हटलं आहे. “लोकांकडे फालतुचा वेळ जास्त आहे. त्यांच्याकडे काही चांगलं करण्यासारख नाहीय. द्वेष आणि मत्सर पसरवण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. माझा तुम्हा सर्वांना सल्ला आहे, तुमच्या बोलण्याने कोणालाही काही फरक पडत नाही किंवा तुमच्या अस्तित्वाची दखल घेतल नाही. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या सुधारणेवर तो वेळ खर्ची घाला” असं नूपुर नागरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलय.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 व्या ओव्हरमध्ये किती धावा दिल्या?

भुवनेश्वरने अलीकडे डेथ ओव्हर्समध्ये बऱ्याच धावा दिल्या आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मॅचमध्ये भुवनेश्वरने 19 व्या ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या. परिणामी ऑस्ट्रेलियाने 206 धावांचे लक्ष्य सहज गाठले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.