Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा एक मोठा प्लेयर टेस्ट सीरीजमधून बाहेर पण बदला घेण्यासाठी पुन्हा येणार

IND vs AUS Test : नागपूर पाठोपाठ दिल्लीत कसोटीत टीम इंडियाने तीन दिवसात विजय मिळवला. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे.

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा एक मोठा प्लेयर टेस्ट सीरीजमधून बाहेर पण बदला घेण्यासाठी पुन्हा येणार
Australian Team Image Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 1:17 PM

IND vs AUS Test : टेस्ट सीरीजमध्ये पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन टीमच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नागपूर पाठोपाठ दिल्लीत कसोटीत टीम इंडियाने तीन दिवसात विजय मिळवला. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी कशी खेळायची? हे ऑस्ट्रेलिया समोरच मोठं आव्हान आहे. त्यात त्यांच्या खेळाडूंना दुखापती होतायत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनर डेविड वॉर्नर कसोटी मालिकेतून बाहेर गेलाय. तो उर्वरित कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. डेविड वॉर्नर उर्वरित टेस्ट सीरीजमध्ये खेळणार नसल्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.

हेल्मेट आणि हातावर चेंडू लागला

दोन टेस्ट मॅचमधील खराब कामगिरी आणि दुखापतीने डेविड वॉर्नरला मायदेशी परतण्यास भाग पाडलय. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये वॉर्नरच्या हेल्मेट आणि हातावर चेंडू लागला होता. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करु शकला नाही.

वनडे सीरीज खेळणार?

डेविड वॉर्नरला कनकशनचा त्रास झाला होता. त्याशिवाय हाताला हेयरलाइन फ्रॅक्चर झालं होतं. आता दुखापतीमुळे तो उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियात उपचार घेऊन वनडे सीरीजसाठी भारतामध्ये परतू शकतो.

सीरीजमध्ये वॉर्नरची कामगिरी कशी?

डेविड वॉर्नरसाठी ही टेस्ट सीरीज खूपच खराब ठरली. त्याने टेस्ट मॅचच्या 3 इनिंगमध्ये 26 धावा केल्या. त्याची सरासरी 10 पेक्षा पण कमी होती. वॉर्नरच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. डेविड वॉर्नरला वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्थान मिळालय.

वनडे सीरीज कधीपासून सुरु होणार

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरीज 17 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई, विशाखापट्टनम आणि चेन्नईमध्ये वनडे सामने खेळले जाणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1 मार्चपासून इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाईल. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियात परतणार

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सही मायदेशी परतणार आहे. कौटुंबिक कारणामुळे तो मायदेशी जाणार आहे. कमिन्सच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी आहे. म्हणून तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण एक मार्चपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी तो भारतात दाखल होईल.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.