Ind vs Aus Weather Update : WTC Final मध्ये कुठले दोन दिवस पाऊस पडणार? जाणून घ्या हवामानाचे ताजे अपडेट
WTC Final 2023 मध्ये पाऊस अडथळा आणणार? पण कुठले दोन दिवस पडणार पाऊस ते जाणून घ्या. इंग्लंडमध्येच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल झाली होती. त्यावेळी पावसाचा मोठा रोल होता.
लंडन : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात फायनल होणार आहे. या मॅचमधील विजेता संघ, टेस्ट क्रिकेटमधील नवीन वर्ल्ड चॅम्पियन असेल. WTC फायनलच्यावेळी लंडनमधील हवामान कसं असेल? हा अनेकांना प्रश्न पडला आहे. दोन्ही टीम्समध्ये फायनलचा सामना सुरु असताना, पाऊस कोसळणार? ही चिंता अनेकांना सतावत आहे. नुकताच IPL 2023 च्या फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता.
पावसामुळे फायनलचा सामना दुसऱ्या म्हणजे रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवावा लागला. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्यावेळी सुद्धा असच घडणार का? अशी भिती अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
WTC च्या पहिल्या फायनलवेळी सुद्धा पावसाने आणलेली बाधा
इंग्लंडमध्येच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल झाली होती. त्यावेळी पावसाचा मोठा रोल होता. साऊथम्पटनमध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये पावसाने वारंवार व्यत्यय आणला होता. टीम्सना खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नव्हतं. पावसाने प्रभावित पहिल्या WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. आता दुसऱ्या फायनलमध्ये असं घडू नये, एवढीच इच्छा आहे.
उत्तर वेदर फोरकास्टमध्ये
सध्याच्या घडीला लंडनमध्ये कसं हवामान आहे? हा मुख्य मुद्दा आहे. पुढचे 5 दिवस हवामान कसं असेल? WTC Final रिझर्व्ह डे च्या दिवशी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर वेदर फोरकास्टमध्ये आहेत. प्रेक्षकांना अपेक्षित WTC Final ची सुरुवात होईल. हा सामना शेवटाकडे जाईल, त्यावेळी मात्र हवामान बदलेलं असेल.
लंडनमध्ये पाऊस कधी कोसळणार?
हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, लंडनमध्ये पहिल्या 3 दिवसात पाऊस खलनायक बनण्याची अजिबात शक्यता नाहीय. पहिले 3 दिवस पाऊस बाधा आणणार नाही, हा अंदाज आहे. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी परिस्थिती बदलू शकते. कसोटीच्या कुठल्या दोन दिवसात कोसळणार पाऊस?
या दोन दिवसात हवामान बदलेलं. पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे कसोटीच्या शेवटच्या दोन दिवसात पाऊस बाधा आणू शकतो. या पावसाचा खेळावर किती परिणाम होणार? या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. असं झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह डे सुद्धा आहे.