IND vs BAN Test Day 1 Report: पुजारा-अय्यर लढले, पहिल्या दिवसअखेर अशी आहे स्थिती
IND vs BAN Test Day 1 Report: दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी मनासारखी झाली नाही, पण....
ढाका: बांग्लादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने दमदार खेळ दाखवला. या दोघांच्या इनिंगच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 278 धावा केल्या आहेत. चटोग्रामच्या जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर हा कसोटी सामना सुरु आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या कसोटीत टीमच नेतृत्व करतोय. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीमला चांगली सुरुवात मिळाली नाही. पण अय्यर आणि पुजाराने टीमचा डाव सावरला. बांग्लादेशने दिवसाअखेरीस 85 व्या व 90 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन भारतावर दबाव वाढवलाय.
पंतची छोटी पण महत्त्वाची इनिंग
दिवसाचा खेळ संपताना श्रेयस अय्यर 82 धावांवर नाबाद होता. उद्या त्याच्यावर टीम इंडियाची भिस्त असेल. दिवसाच्या अखेरीस मेहदी हसन मिराजने अक्षर पटेलला (14) आऊट केलं. पुजारा 89 धावांवर बाद झाला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 203 चेंडूंचा सामना केला. 11 चौकार मारले. ऋषभ पंत छोटी पण आक्रमक इनिंग खेळून गेला. त्यामुळे टीमवरील दबाव कमी झाला. पंतने 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.
ताइजुलने वाढवल्या अडचणी
कॅप्टन राहुल आणि सलामीवीर शुभमन गिल टीमला चांगल्या सुरुवातीकडे घेऊन जात होते. पण 41 धावांवर ताइजुल इस्लामने गिलला बाद केलं. त्याने 20 रन्स केल्या. त्यानंतर खालीद अहमदने राहुलला बोल्ड केलं. राहुलने 22 धावा केल्या. तीन धावांनंतर विराट कोहलीला ताइजुलने बाद केलं. कोहलीने फक्त एक रन्स केला.
पंतने यानंतर पुजारासोबत मिळून डाव सावरला. पुजारा संयमी फलंदाजी करत होता. त्याचवेळी पंतने वेगाने धावा बनवून बांग्लादेशवरील दबाव वाढवला. मेहेदी हसन मिराजच्या चेंडूवर तो बाद झाला.
Stumps on Day 1⃣ of the first #BANvIND Test!@ShreyasIyer15 remains unbeaten on 8⃣2⃣* as #TeamIndia reach 278/6 at the end of day’s play ?
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44N7IRe pic.twitter.com/muGIlGUbNE
— BCCI (@BCCI) December 14, 2022
पुजारा आणि अय्यरने सावरला डाव
त्यानंतर अय्यर आणि पुजाराने डाव सावरला. दोघांनी व्यवस्थितपणे बांग्लादेशी गोलंदाजांचा सामना केला. दोघांनी चांगले स्ट्रोक्स मारुन अर्धशतक पूर्ण केलं. 112 वरुन त्यांनी टीमची धावसंख्या 261 पर्यंत पोहोचवली. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने कसोटीच्या पहिल्यादिवशी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 6 बाद 278 धावा झाल्या आहेत. पुजाराने 203 चेंडूत 90 धावा आणि श्रेयस अय्यरने 169 चेंडूत 82 रन्स केल्या आहेत.