IND Vs BAN, 2nd ODI Match Live Streaming: कधी, कुठे कसा पाहून शकता दुसरा वनडे सामना, जाणून घ्या
Watch India vs Bangladesh Match Live: एका क्लिकवर जाणून घ्या, दुसऱ्या वनडे सामन्याचे सर्व डिटेल्स.
ढाका: टीम इंडियाच्या बांग्लादेश दौऱ्याची निराशाजनक सुरुवात झाली आहे. वनडे सीरीजचा पहिला सामना खूपच रोमांचक झाला. पण टीम इंडियाचा एक विकेटने पराभव झाला. टीम इंडिया सध्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाकडे बरोबरी साधण्याची संधी आहे. दुसरा वनडे सामना सुद्धा शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर होणार आहे. प्रतिष्ठेच्या दृष्टीने रोहित शर्मा अँड कंपनीसाठी दुसरा सामना महत्त्वाचा आहे.
पहिल्या वनडे सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल भारतीय खेळाडूंवर मॅच फी च्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला. टीम इंडियाने निर्धारित वेळेपेक्षा चार षटकं कमी टाकली होती, असं आयसीसी पॅनलचे मॅच रेफरी रंजन मदुगले म्हणाले.
पहिल्या वनडे भारताची फ्लॉप फलंदाजी
पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीमची फलंदाजी फ्लॉप ठरली. केएल राहुलसोडून कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर सारखे फलंदाज असूनही टीम पूर्ण 50 ओव्हर्स खेळू शकली नाही. 41.2 ओव्हर्समध्ये संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. बांग्लादेशची टीम चांगल्या सुरुवातीनंतरही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाही.
कधी खेळला जाणार भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना? भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना मंगळवारी 7 डिसेंबरला खेळला जाईल.
भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना कुठे खेळला जाणार? भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना ढाकाच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमममध्ये खेळला जाईल.
भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना कधी सुरु होणार? भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा वनडे सामना सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. टॉस सकाळी 11 वाजता उडवला जाईल.
भारत आणि बांग्लादेशमधील दुसरा वनडे सामना तुम्ही कुठे पाहू शकता? भारत आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या वनडे सामन्याच लाइव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर होईल.
भारत आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? भारत आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.