IND vs BAN: बांग्लादेशच्या कमकुवत बाजूवर टीम इंडियाकडून होणार हल्ला, ‘हा’ गोलंदाज पडणार भारी
IND vs BAN: 34 दिवसापूर्वी जे घडलं, त्याची पुनरावृत्ती दुसऱ्या वनडे सामन्यात दिसू शकते.
ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये वनडे सीरीजचा दुसरा सामना बुधवारी ढाका येथे होणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ आहे. कारण पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव झालाय. आता टीम इंडियाचा पराभव झाला, तर ते मालिका गमावतील. मागच्या सामन्यात टीम इंडियाचा अवघ्या 1 विकेटने पराभव झाला होता. आता रोहित अँड कंपनी पलटवार करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल होऊ शकतो. बांग्लादेशच्या कमकुवत बाजूवर टीम इंडिया घाव घालण्याच्या तयारीत आहे.
बांग्लादेशची कमकुवत बाजू काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार पहिल्या वनडेमध्ये शार्दुल ठाकूरने शानदार गोलंदाजी केली. पण तो अनफिट ठरला. त्याचं दुसऱ्या मॅचमध्ये खेळणं कठीण आहे. त्याच्याजागी उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. उमरान खेळणार असेल, तर बांग्लादेशच्या अडचणी वाढू शकतात. कारण बांग्लादेशच्या टीमला वेगवान गोलंदाजी खेळणं आवडत नाही.
कोण आहे तो टीम इंडियाचा गोलंदाज?
उमरान मलिक खेळला, तर त्याचा वेग बांग्लादेशच्या टीमसाठी काळ बनू शकतो. बांग्लादेशच्या फलंदाजांना एक्सप्रेस वेगवान गोलंदाजी खेळताना अडचण येते. खासकरुन गोलंदाजीचा वेग 145 किमीप्रतितास पेक्षा जास्त असेल, तर बांग्लादेशच्या अडचणी वाढतात.
हार्दिक, अर्शदीपने केलं हैराण
34 दिवसआधी टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 राऊंडमध्ये टीम इंडिया आणि बांग्लादेशच्या टीम आमने-सामने होत्या. त्यावेळी बांग्लादेशची टीम जिंकता, जिंकता हरली होती. लिट्टन दासने टीमला जोरदार सुरुवात दिली होती. पण पावसानंतर खेळ सुरु झाला, त्यावेळी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी शॉर्ट बॉल्सचा पाऊस पाडला. हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंहने आपल्या शॉर्ट चेंडूंनी बांग्लादेशच्या फलंदाजांना हैराण केलं. टीम इंडियाने हा सामना जिंकला होता.
त्याची गोलंदाजी चालली, तर बांग्लादेशची लागणार वाट
टी 20 वर्ल्ड कपमध्येच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांग्लादेशची टीम सरेंडर झाली होती. नॉर्खियाने बांग्लादेश विरुद्ध 10 धावा देऊन 4 विकेट काढल्या होत्या. उमरान मलिकचा वेग नॉर्खियापेक्षा कमी नाहीय. त्यामुळे उमरानची गोलंदाजी चालली, तर बांग्लादेशची वाट लागणार हे निश्चित आहे.
शॉर्ट पीच चेंडूवर खराब रेकॉर्ड
बांग्लादेशी टीमचे फलंदाज पेस आणि बाऊन्सचा सामना करताना अडचणीत येतात. शॉर्ट पीच चेंडू खेळताना बांग्लादेशचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. बांग्लादेशची टीम शॉर्ट चेंडू खेळताना 20 पेक्षा कमी सरासरीने धावा बनवते.