IND vs BAN 2nd Test Match Live Streaming: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता दुसरा कसोटी सामना, जाणून घ्या
IND vs BAN 2nd Test Match Live Streaming: सामन्याचे सर्व डिटेल्स जाणून घ्या. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
ढाका: बांग्लादेश विरुद्ध टीम इंडियाने वनडे सीरीज गमावली. पण टेस्टमध्ये टीम इंडियाने कामगिरी सुधारली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळला जाणार आहे. दोनही टीम्स खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करतायत. बांग्लादेशसाठी एक चांगली बातमी आहे. शाकीब अल हसन दुसऱ्या आणि अंतिम कसोटीत गोलंदाजी करण्यासाठी फिट आहे. चट्टोग्राममध्ये दुसऱ्याडावात तो गोलंदाजी करु शकला नव्हता.
बॉलिंग कोच डोनाल्ड काय म्हणाले?
“शाकीब आता चांगला आहे. तो गोलंदाजी करेल. वनडे सामन्यात त्याला दुखापत झाली होती. पण तो आता त्यातून सावरला आहे. तो निवडीसाठी उपलब्ध आहे. तो गोलंदाजी करु शकतो” असं बांग्लादेशचे बॉलिंग कोच अॅलन डोनाल्ड म्हणाले. वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळेल. “तस्कीन खेळण्यासाठी तयार आहे. त्याला शेवटच्या कसोटी सामन्यात खेळायच होतं” असं डोनाल्ड म्हणाले.
कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये कधी खेळला जाणार दुसरा कसोटी सामना?
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना बुधवारी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत खेळला जाईल.
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना कुठे खेळला जाणार?
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियम ढाका येथे खेळला जाईल.
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार?
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना सकाळी 9 वाजता सुरु होईल. टॉस सकाळी 8.30 वाजता उडवला जाईल.
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना कुठे पाहू शकता?
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दुसरा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता,
टीम इंडिया आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या टेस्ट मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
टीम इंडिया आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या टेस्ट मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह APP वर पाहू शकता. या टेस्टशी संबंधित अपडेट्स tv9marathi.com वर वाचू शकता.