IND vs BAN T20 WC: 4,4,4,6,6,6,6 बघा KL Rahul ने बांग्लादेशच्या गोलंदाजांना कसं धुतलं

IND vs BAN T20 WC: शोरीफुल इस्लाम केएल राहुलने बॅटिंग करताना दिलेला तडका नाही विसरणार.

IND vs BAN T20 WC: 4,4,4,6,6,6,6 बघा KL Rahul ने बांग्लादेशच्या गोलंदाजांना कसं धुतलं
Kl rahul Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 2:41 PM

एडिलेड: टीम इंडियाचा आज बांग्लादेश विरुद्ध एडिलेड ओव्हलच्या मैदानात सामना सुरु आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पुढे प्रवास सुरु ठेवण्यासाठी टीम इंडियाला आजची मॅच जिंकावीच लागेल. या मॅचमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने धमाकेदार बॅटिंग केली. त्याने बांग्लादेशच्या गोलंदाजांना चांगलच धुतलं. खासकरुन शोरीफुल इस्लामला.

राहुलने घेतला समाचार

केएल राहुलने आज मागच्या तीन सामन्यातील अपयश धुवून काढला. पाकिस्तान, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4,9,9 अशा धावा केल्या होत्या. केएल राहुलने आज बांग्लादेश विरुद्ध ते अपयश मागे सोडलं. त्याने बांग्लादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

एक ओव्हरमध्ये 24 धावा लुटल्या

रोहित शर्मासोबत मिळून त्याने संयमी सुरुवात केली. रोहित आज अवघ्या 2 धावांवर बाद झाला. 11 धावांवर टीम इंडियाला रोहितच्या रुपाने पहिला झटका बसला. त्यानंतर केएल राहुलने विराटच्या साथीने मिळून डाव सावरला. त्याने बांग्लादेशच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. शोरीफुल इस्लामच्या 9 व्या ओव्हरमध्ये त्याने 24 धावा लुटल्या.

टीम इंडियाच्या 10 ओव्हर्समध्ये किती धावा?

केएल राहुलने आज 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. रोहितच टी 20 क्रिकेटमधील हे 21 व अर्धशतक आहे. हाफ सेंच्युरीनंतर राहुल लगेच आऊट झाला. शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर त्याने मुस्तफीझूर रहमानकडे सोपा झेल दिला. टीम इंडियाच्या 10 ओव्हर्समध्ये 2 बाद 86 धावा झाल्या आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.