IND Vs BAN, 1st ODI, Live Score: मेहदी हसन मिराजने एकट्याने मॅच फिरवली, टीम इंडिया हरली

| Updated on: Dec 04, 2022 | 7:45 PM

IND Vs BAN, 1st ODI लाइव्ह अपडेट: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. टीम इंडियाच नेतृत्व रोहित शर्माकडे आणि बांग्लादेशच नेतृत्व लिट्टन दासकडे आहे.

IND Vs BAN, 1st ODI, Live Score: मेहदी हसन मिराजने एकट्याने मॅच फिरवली, टीम इंडिया हरली
ind vs ban 1st odi Live Score

IND vs BAN, LIVE Score, 1st ODI: टीम इंडियाचा पहिल्या वनडेमध्ये पराभव झाला आहे. मेहदी हसन मिराजने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. मेहदी हसन मिराज आणि मुस्तफीजूर रहमानमध्ये शेवटच्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. मेहदी हसन मिराजने 39 चेंडूत नाबाद 38 आणि रहमानने नाबाद 10 धावा केल्या.

बांग्लादेश आणि भारतामध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. बांग्लादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 187 धावांच लक्ष्य दिलं होतं. बांग्लादेशने 46 व्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केलं.

भारत टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप सेन, उमरान मलिक, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज

बांग्लादेश टीम: लिट्टन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिबुल हसन, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसैन, यासिर चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तास्किन अहमद, हसन महमूद, इबादत हुसैन चौधरी, नासुम अहमद, महमूद उल्लाह, नजमुल हुसैन शांटो, काजी नुरूल हसन सोहन, शोरफुल इस्लाम,

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Dec 2022 07:16 PM (IST)

    IND vs BAN Live Score: मेहदी हसन मिराजने एकट्याने मॅच फिरवली

    IND vs BAN Live Score: मेहदी हसन मिराजने एकट्याने मॅच फिरवली. बांग्लादेशने एक विकेटने मॅच जिंकली. शेवटच्या विकेटसाठी मेहदी हसन मिराज आणि मुस्तफीजूर रहमानमध्ये 51 धावांची भागीदारी झाली. मेहदी हसन मिराजने 39 चेंडूत नाबाद 38 आणि रहमानने नाबाद 10 धावा केल्या.

  • 04 Dec 2022 07:02 PM (IST)

    IND vs BAN Live Score: मॅच रोमांचक वळणावर

    मॅच रोमांचक वळणावर आहे. बांग्लादेशला विजयासाठी 36 चेंडूत 14 धावांची गरज आहे. मेहदी हसन मिराज 31 धावांवर खेळतोय.

  • 04 Dec 2022 06:53 PM (IST)

    जत तालुका पाणी संघर्ष समितीचा घरचा आहेर

    Marathi News LIVE Update जत तालुका पाणी संघर्ष समितीचा घरचा आहेर

    संघर्ष समिती पाण्याच्या मुद्यावर आक्रमक

    पाणी न मिळाल्यास कर्नाटकमध्ये जाण्यावर समिती ठाम

    कर्नाटकमध्ये जाण्यासाठी प्रत्येक गावातून ना हरकत घेण्याची मोहिम राबविणार

    20 डिसेंबरनंतर समिती पुन्हा आंदोलन करणार

  • 04 Dec 2022 06:46 PM (IST)

    IND vs BAN Live Score: बांग्लादेशला विजयासाठी 32 धावांची गरज

    42 ओव्हनंतर बांग्लादेशच्या 9 बाद 155 धावा झाल्या आहेत. बांग्लादेशची शेवटची जोडी मैदानात आहे. हसन मिराज (15) आणि मुस्तफीजूनर रहमान (4) धावांवर खेळतोय.

  • 04 Dec 2022 06:31 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडिया विजयापासून एक पाऊल दूर

    हसन महमूदला मोहम्मद सिराजने शुन्यावर पायचीत पकडलं. बांग्लादेशची 39.3 ओव्हर्समध्ये 136/9 अशी स्थिती आहे.

  • 04 Dec 2022 06:25 PM (IST)

    IND vs BAN Live Score: बांग्लादेशची आठवी विकेट

    बांग्लादेशची आठवी विकेट पडली आहे. इबादत होसेन शुन्यावर बाद झाला. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर तो हिट विकेट झाला. 39 ओव्हरनंतर बांग्लादेशच्या 8 बाद 135 धावा झाल्या आहेत.

  • 04 Dec 2022 06:20 PM (IST)

    IND vs BAN Live Score: बांग्लादेशची सातवी विकेट

    बांग्लादेशची सातवी विकेट पडली आहे. अतीफ होसेन (6) धावांवर बाद झाला. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने झेल घेतला. बांग्लादेशच्या 7 बाद 134 धावा झाल्या आहेत.

  • 04 Dec 2022 06:16 PM (IST)

    IND vs BAN Live Score: भारताची टिच्चून गोलंदाजी

    38 ओव्हरनंतर बांग्लादेशच्या 6 बाद 134 धावा झाल्या आहेत. अतीफ होसेन (6) आणि हसन मिराजची जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 06:13 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडिया 4 विकेट काढणार?

    सामना रंगतदार वळणार आहे. बांग्लादेशच्या चार विकेट शिल्लक आहेत. 13 ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. अतीफ होसेन आणि हसन मिराजची जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 06:05 PM (IST)

    IND vs BAN Live Score: बांग्लादेश अडचणीत, लागोपाठ दोन विकेट

    बांग्लादेशची टीम अडचणीत सापडली आहे. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने लागोपाठ दोन विकेट काढल्या. आधी शार्दुलने महमदुल्लाहला (14) धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर सिराजने मुशफिकूर रहीमला (18) रन्सवर क्लीन बोल्ड केलं. 35.3 ओव्हर्समध्ये बांग्लादेशच्या 6 बाद 128 धावा झाल्या आहेत.

  • 04 Dec 2022 06:01 PM (IST)

    IND vs BAN Live Score: एकदम कडक, Virat Kohli ने पकडलेली कॅच पाहून तुम्ही अवाक व्हाल, VIDEO

    IND vs BAN: काय विराटने फिल्डिंग केली, जिंकलस भावा….वाचा सविस्तर…

  • 04 Dec 2022 05:37 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 30 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

    30 ओव्हरनंतर बांग्ंलादेशच्या चार बाद 116 धावा झाल्या आहेत. मुशफीकूर रहिम 14 आणि महमदुल्लाहची 11 जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 05:34 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 29 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    29 ओव्हरनंतर बांग्ंलादेशच्या चार बाद 110 धावा झाल्या आहेत. मुशफीकूर रहिम 11 आणि महमदुल्लाहची 8 जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 05:07 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडियाला चौथं यश

    भारताला चौथं यश मिळालं आहे. सेट झालेला शाकीब अल हसन 29 धावांवर आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एकाहाताने जबरदस्त झेल घेतला. 24 ओव्हरनंतर बांग्लादेशच्या 4 बाद 97 धावा झाल्या आहेत.

  • 04 Dec 2022 04:54 PM (IST)

    प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे

    Marathi News LIVE Update

    प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे

    रुपाली पाटील यांचे वक्तव्य

    शिवारायांवरील वक्तव्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक

    भाजपच्या नेत्यांना तंबी देण्याचा पंतप्रधानांना इशारा

  • 04 Dec 2022 04:51 PM (IST)

    IND vs BAN Live Score: लिट्टन दास-शाकीबची जोडी फुटली

    लिट्टन दास आणि शाकीब अल हसनची जोडी फुटली आहे. वॉशिंग्टन सुंदरने यश मिळवून दिलं. यष्टीपाठी केएल राहुलने सुंदर झेल घेतला. चाचपडत खेळणारा कॅप्टन लिटन दास बाद झाला. त्याने 63 चेंडूत 41 धावा केल्या. 20 ओव्हर अखेरीस बांग्लादेशच्या 3 बाद 77 धावा झाल्या आहेत.

  • 04 Dec 2022 04:30 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 15 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

    15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय, बांग्लादेशच्या 2 बाद 51 धावा झाल्या आहेत. कॅप्टन लिट्टन दास 24 आणि शाकीब अल हसन 8 धावांवर खेळतोय.

  • 04 Dec 2022 04:12 PM (IST)

    IND vs BAN Live Score: डेब्यु करणाऱ्या कुलदीप सेनची पहिली ओव्हर

    टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु करणाऱ्या कुलदीप सेनने पहिली ओव्हर टाकली. 12 ओव्हर अखेरीस बांग्लादेशच्या 2 बाद 35 धावा झाल्या आहेत. कुलदीपने पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या.

  • 04 Dec 2022 04:01 PM (IST)

    IND vs BAN Live Score: बांग्लादेशच्या दोन विकेट

    10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. बांग्लादेशच्या दोन बाद 30 धावा झाल्या आहेत. मोहम्मद सिराज आणि दीपक चाहर यांनी टिच्चून गोलंदाजी केली. त्यांनी बांग्लादेशी फलंदाजांना अनेकदा चकवल सुद्धा. अनामुलच्या रुपाने बांग्लादेशचा दुसरा विकेट गेला. 14 धावांवर त्याला मोहम्मद सिराजने वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद केलं. कॅप्टन लिट्टन दास (11) आणि शाकीब अल हसनची (4) जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 03:31 PM (IST)

    IND vs BAN Live Score: लिट्टन दास-अनामुलचा टिकून खेळण्याचा प्रयत्न

    5 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. बांग्लादेशच्या एक बाद 15 धावा झाल्या आहेत. कॅप्टन लिट्टन दास (4) आणि अनामुलची जोडी (11) मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 03:24 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. बांग्लादेशच्या एक बाद 8 धावा झाल्या आहेत. कॅप्टन लिट्टन दास (4) आणि अनामुलची जोडी (4) मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 03:11 PM (IST)

    IND vs BAN Live Score: पहिल्याच बॉलवर बांग्लादेशला धक्का

    टीम इंडियाने पहिल्याच बॉलवर बांग्लादेशला धक्का दिलाय. बांग्लादेशचा ओपनर नजमुल होसेन शांटो शुन्यावर बाद झाला. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने स्लीपमध्ये झेल घेतला.

  • 04 Dec 2022 03:06 PM (IST)

    IND vs BAN: टीम इंडिया बांग्लादेशसमोर सरेंडर, ‘या’ गोलंदाजासमोर काहीच चाललं नाही

    IND vs BAN: 52 चेंडू बाकी असताना, टीम इंडियाचा डाव संपुष्टात आला. वाचा सविस्तर….

  • 04 Dec 2022 02:40 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडिया Allout

    41.2 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा डाव 186 धावांवर संपुष्टात आला. शाकीब अल हसन आणि इबादत होसेन या दोन गोलंदाजांनी टीम इंडियाची वाट लावली. शाकीबने 10 ओव्हर्समध्ये 36 धावा देऊन 5 आणि इबादतने 8.2 ओव्हर्समध्ये 47 धावा देऊन 4 विकेट काढल्या. टीम इंडियाकडून फक्त केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

  • 04 Dec 2022 02:32 PM (IST)

    IND vs BAN Live Score: अखेर एकटा लढणारा केएल राहुल बाद

    विकेट पडत असताना एकाबाजूने पाय रोवून उभा असलेला केएल राहुल बाद झाला. त्याने 70 चेंडूत 73 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 4 षटकार आहेत. 40 ओव्हर अखेरीस टीम इंडियाची 9 बाद 179 स्थिती आहे.

  • 04 Dec 2022 02:08 PM (IST)

    IND vs BAN Live Score: दीपक चाहर OUT

    टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतण्याची स्पर्धा लागली आहे. दीपक चाहर आल्यापावली पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला शाकीब अल हसनने शुन्यावर पायचीत पकडलं. शाकीबने 21 धावात 5 विकेट घेतल्या आहेत. 35 ओव्हर्सनंतर टीम इंडियाची 158 /8 स्थिती आहे.

  • 04 Dec 2022 02:03 PM (IST)

    IND vs BAN Live Score: चार रन्समध्ये टीम इंडियाच्या 3 विकेट

    चार रन्समध्ये टीम इंडियाच्या 3 विकेट गेल्या आहेत. शार्दुल ठाकूरला शाकीब अल हसनने बोल्ड केलं. शार्दुलने 2 धावा केल्या. 152 ते 156 धावा दरम्यान वॉशिंग्टन सुंदर, शहाबाज अहमद आणि शार्दुल ठाकूर या तीन विकेट गेल्या आहेत.

  • 04 Dec 2022 01:57 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडिया संकटात

    वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला शहाबाज अहमद शुन्यावर आऊट झाला. इबादत हौसेनने त्याला शाकीब अल हसनकरवी झेलबाद केलं. 33.2 ओव्हर्समध्ये टीम इंडियाची 154/6 अशी स्थिती आहे.

  • 04 Dec 2022 01:51 PM (IST)

    IND vs BAN Live Score: केएल राहुलची हाफसेंच्युरी, वॉशिंग्टन सुंदर OUT

    केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केलय. हे त्याच 11 व अर्धशतक आहे. 50 चेंडूत तो 53 धावांवर खेळतोय. यात 3 चौकार आणि 3 षटकार आहेत. वॉशिंग्टन सुंदर 43 चेंडूत 19 धावांवर आऊट झाला. शाकीब अल हसनने त्याला इबादत होसेनकरवी झेलबाद केलं.

  • 04 Dec 2022 01:39 PM (IST)

    IND vs BAN Live Score: राहुलची दमदार बॅटिंग

    30 ओव्हर्स अखेरीस टीम इंडियाच्या 4 बाद 142 धावा झाल्या आहेत. केएल राहुल 45 चेंडूत 44 आणि वॉशिंग्टन सुंदर 33 चेंडूत 18 धावांवर खेळतोय. राहुलने 1 चौकार आणि 3 षटकार लगावले.

  • 04 Dec 2022 01:16 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 25 ओव्हर्स पूर्ण

    25 ओव्हर्सनंतर टीम इंडियाच्या 4 बाद 105 धावा झाल्या आहेत. केएल राहुल 21आणि वॉशिंग्टन सुंदरची 7 जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 01:01 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडियाला झटका

    टीम इंडियाला चौथा झटका बसला आहे. 20 ओव्हर अखेरीस 4 बाद 92 धावा झाल्या आहेत. इबादत होसेनने श्रेयसला मुश्तफीकूर रहीमकरवी झेलबाद केलं. श्रेयस अय्यरने 39 चेंडूत 24 धावा केल्या. त्याने 2 चौकार लगावले.

  • 04 Dec 2022 12:55 PM (IST)

    IND vs BAN Live Score: श्रेयस-राहुलने सावरला डाव

    19 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 3 बाद 89 धावा झाल्या आहेत. श्रेयस 23 आणि राहुल 13 धावांवर खेळतोय.

  • 04 Dec 2022 12:43 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 3 विकेटनंतर श्रेयस-राहुलची सावध फलंदाजी

    17 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 3 बाद 80 धावा झाल्या आहेत. श्रेयस 16 आणि राहुल 11 धावांवर खेळतोय.

  • 04 Dec 2022 12:18 PM (IST)

    IND vs BAN Live Score: रोहित पाठोपाठ विराट आऊट

    रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली तंबूत परतलाय. रोहितनंतर अवघ्या एका चेंडूच्या फरकाने 11 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर विराट बाद झाला. शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर लिट्टन दासने त्याचा जबरदस्त झेल घेतला. विराटने 15 चेंडूत 9 धावा केल्या. यात एक चौकार आहे. 11 ओव्हर्सनंतर टीम इंडियाची 49/3 अशी स्थिती आहे.

  • 04 Dec 2022 12:14 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडियाला मोठा झटका

    रोहित शर्माच्या रुपाने टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. तो 27 रन्सवर आऊट झाला. शाकीब अल हसनने त्याला बोल्ड केलं. विराट कोहलीची साथ द्यायला श्रेयस अय्यर मैदानात आलाय.

  • 04 Dec 2022 12:12 PM (IST)

    IND vs BAN Live Score: 10 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

    10 ओव्हर्सनंतर टीम इंडियाच्या 1 बाद 48 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 29 चेंडूत 27 आणि विराट कोहली 14 चेंडूत 9 धावांवर खेळतोय. रोहितने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला आहे.

  • 04 Dec 2022 12:03 PM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडियाला पहिला झटका

    7 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. टीम इंडियाच्या एक बाद 30 धावा झाल्या आहेत. शिखर धवनच्या रुपाने टीम इंडियाला पहिला झटका बसला. मेहदी हसन मिराजने त्याला बोल्ड केलं. 17 चेंडूत त्याने 7 धावा केल्या. यात एक चौकार होता. कॅप्टन रोहित शर्मा (22) आणि विराट कोहलीची (1) जोडी मैदानात आहे.

  • 04 Dec 2022 11:59 AM (IST)

    वानखेडेवर एका इनिंगमध्ये 10 विकेट, पण तरीही टीममधून काढलं, ‘हा’ आहे क्रिकेटविश्वातील कमनशिबी बॉलर

    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने जी कामगिरी केली, त्याला तोड नव्हती, या कसोटीचा निकाल काय लागला? वाचा सविस्तर….

  • 04 Dec 2022 11:48 AM (IST)

    IND vs BAN Live Score: 4 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    4 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. टीम इंडियाच्या बिनबाद 13 धावा झाल्या आहेत. रोहित 6 आणि शिखर धवन 6 रन्सवर खेळतोय.

  • 04 Dec 2022 11:40 AM (IST)

    IND vs BAN Live Score: रोहित शर्मा-शिखर धवनची जोडी मैदानात

    पहिला वनडे सामना सुरु झाला आहे. रोहित शर्मा-शिखर धवनची जोडी मैदानात आहे. दोन ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. मुस्ताफिझूर रहमानने पहिलं षटक निर्धाव टाकलं.

  • 04 Dec 2022 11:28 AM (IST)

    IND vs BAN Live Score: आणखी एक खेळाडू वनडे सीरीजमधून बाहेर, BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

    IND vs BAN: आणखी एक खेळाडू वनडे सीरीजमधून बाहेर, BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट, वाचा सविस्तर….

  • 04 Dec 2022 11:13 AM (IST)

    IND vs BAN Live Score: अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

    भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिखर धवन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर,

  • 04 Dec 2022 11:10 AM (IST)

    IND vs BAN Live Score: बांग्लादेशने जिंकला टॉस

    बांग्लादेशचा कॅप्टन लिट्टन दासने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

  • 04 Dec 2022 10:52 AM (IST)

    IND vs BAN Live Score: शमीच्या जागी उमरानचा टीममध्ये समावेश

    मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय. उमरान मलिककडे आता बांग्लादेश दौऱ्यात छाप पाडण्याची संधी आहे. न्यूझीलंडमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली होती.

  • 04 Dec 2022 10:49 AM (IST)

    IND vs BAN Live Score: टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध सामना

    टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. सीरीजचा पहिला सामना ढाकाच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

Published On - Dec 04,2022 10:48 AM

Follow us
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.