IND vs BAN: बर्थडेच्या एकदिवस आधी धवनला झटका, करिअर संकटात
IND vs BAN: शिखर धवनसमोर आता फार कमी पर्याय....
ढाका: टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. टीममध्ये स्थान कायम टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या बॅटमधून धावा निघणं आवश्यक आहे. पण धवनला हीच गोष्ट जमत नाहीय. आज शिखर धवन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. बांग्लादेश विरुद्ध 17 चेंडूत त्याचा खेळ संपला. तो 7 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.
…तर करिअर संपल्यात जमा
5 डिसेंबरला शिखर धवनचा 37 वा वाढदिवस आहे. पण त्यापूर्वीच धवनला झटका बसलाय. शिखर धवन या सीरीजमध्ये चालला नाही, तर त्याचं करिअर संपल्यात जमा आहे, अशी चर्चा आहे. धवन मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.
मिराजची गोलंदाजी खेळताना संघर्ष
मिराजची गोलंदाजी खेळताना शिखर धवन आणि कॅप्टन रोहित शर्माचा संघर्ष सुरु होता. मिराजने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन्स दिला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने धवनला बोल्ड केलं.
धवनचा खराब फटका
मिराजच्या गोलंदाजीवर धवनने रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकला. चेंडू छातीला लागला. त्यानंतर हाताला लागून स्टम्पसला लागला. धवनच्या खराब बॅटिंगवर फॅन्सही निराश झाले. त्याला टीममधून बाहेर बसवण्याची मागणी होत आहे.
धवनचा खराब फॉर्म कायम
न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेत धवनकडे नेतृत्व होतं. त्यावेळी सुद्धा त्याची बॅट चालली नव्हती. 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये तो फक्त एकदाच 72 धावांची इनिंग खेळला होता. मागच्या 10 वनडे इनिंगमध्ये त्याने दोन वेळाच अर्धशतकी खेळी केली आहे. 4 वेळा तो 10 धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही.