IND vs ENG 2nd Test Day 5 Live : भारताने कसोटी जिंकली, इंग्लंडवर रोमहर्षक विजय, 120 धावात इंग्लंड ऑल आऊट, भारताचा 151 धावांनी विजय

| Updated on: Aug 17, 2021 | 3:23 PM

India vs England 1st Test Day 5 Live Score: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु आहे. सामना अत्यंत रंगतदार स्थितीत असून आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे.

IND vs ENG 2nd Test Day 5 Live : भारताने कसोटी जिंकली, इंग्लंडवर रोमहर्षक विजय, 120 धावात इंग्लंड ऑल आऊट, भारताचा 151 धावांनी विजय
भारत विरुद्ध इंग्लंड

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.

Key Events

शमी आणि बुमराहची विक्रमी भागीदारी

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी करत 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 77 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल (Madan Lal) आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती. त्यांचा हा विक्रम शमी आणि बुमराहने मोडीत काढला आहे.

रहाणे-पुजाराची चिवट खेळी

दुसऱ्या डावात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली होती. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या डावात 5 धावा करुन बाद झाला. पाठोपाठ 21 धावा करुन रोहित शर्मादेखील माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 20 धावांवर असताना सॅम करनची शिकार ठरला. भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेल्यानंतर भारताचा डाव भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने सावरला. या जोडीने तब्बल 297 चेंडूत शतकी भागीदारी रचून भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक फटकावलं. त्याने 146 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. तर पुजाराने 45 धावांची खेळी केली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Aug 2021 11:07 PM (IST)

    इंग्लंडचा अखेरचा फलंदाज बाद भारताचा इंग्लंडवर 151 धावांनी विजय

    मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला त्रिफळाचित करत इंग्लंडचा 10 वा फलंदाज बाद केला आहे. त्यामुळे या सामन्यात भारताने इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला.

  • 16 Aug 2021 11:04 PM (IST)

    इंग्लंडचा 9 वा गडी माघारी, बटलर 25 धावांवर बाद, भारताला विजयासाठी एका विकेटची गरज

    इंग्लंडचा 9 वा गडी माघारी परतला आहे. मोहम्मद सिराजने जॉस बटलरला 25 धावांवर असताना विकेटकीपर रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. विजयासाठी भारताला 8.4 षटकात एका विकेटची आवश्यकता आहे. (इंग्लंड 120/9)

  • 16 Aug 2021 10:59 PM (IST)

    इंग्लंडला 8 वा झटका, ऑली रॉबिन्सन 9 धावांवर बाद, विजयासाठी 2 विकेटची आवश्यकता

    भारताला 8 वी विकेट मिळाली आहे. जसप्रीत बुमराहने ऑली रॉबिन्सनला 9 धावांवर असताना पायचित केलं. 9.1 षटकात भारताला 2 विकेटची गरज आहे. (इंग्लंड 120/8)

  • 16 Aug 2021 10:03 PM (IST)

    इंग्लंडला सातवा झटका, सॅम करन बाद

    इंग्लंडला सातवा झटका, सॅम करन बाद

  • 16 Aug 2021 09:40 PM (IST)

    इंग्लंडचा 6 वा गडी माघारी, मोईन अली 13 धावांवर बाद

    इंग्लंडने 6 वी विकेट गमावली आहे. मोहम्मद सिराजने मोईन अलीला पायचित केलं. त्याने 13 धावांचं योगदान दिलं. (इंग्लंड 90/6)

  • 16 Aug 2021 08:47 PM (IST)

    सामन्यावर भारताची मजबूत पकड, बुमराहकडून जो रुटची शिकार, इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

    भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळाली आहे. जसप्रीत बुमराहने जो रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद करुन इंग्लंडचा 5 वा गडी तंबूत धाडला आहे. रुटने 33 धावांचं योगदान दिलं. (इंग्लंड 67/5)

  • 16 Aug 2021 08:16 PM (IST)

    भारताला चौथं यश, जॉनी बेअरस्टो 2 धावांवर बाद

    भारताला चौथी विकेट मिळाली आहे. इशांत शर्माने जॉनी बेअरस्टोला 2 धावांवर असताना पायचित करुन पव्हेलियनचा रस्ता दाखवला (इंग्लंड 67/4)

  • 16 Aug 2021 07:54 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा झटका, हसीब हमीद 9 धावांवर बाद

    इंग्लंडने तिसरी विकेट गमावली आहे. इशांत शर्माने हसीब हमीदला 9 धावांवर असताना पायचित केलं. (इंग्लंड 44/3)

  • 16 Aug 2021 06:46 PM (IST)

    IND vs ENG : इंग्लंडचा दुसरा गडीही बाद

    इंग्लंडला दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखी एक झटका बसला आहे. शमीच्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतने डॉमनिक सिबलीचा झेल पकडला आहे.

  • 16 Aug 2021 06:40 PM (IST)

    IND vs ENG : इंग्लंडच्या डावाला सुरुवात, पहिला गडी तंबूत परत

    भारताने 272 धावांचे लक्ष्य दिल्यानंतर इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. पण पहिल्या ओव्हरमध्येच भारताच्या बुमराहने सलामीवीर रॉरी बर्न्सला बाद केलं आहे. सिराजने त्याचा झेल पकडला आहे.

  • 16 Aug 2021 06:32 PM (IST)

    IND vs ENG : भारताकडून डाव घोषित

    भारताचे शेवटच्या फळीतील फलंदाज जसप्रीस बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम फलंदाजी केली. ज्यामुळे इंग्लंडला त्यांना बाद करणे जमले नाही. ज्यामुळे अखेर भारताने आपला डाव 298 धावांवर घोषित करत 272 धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिलं आहे.

  • 16 Aug 2021 05:35 PM (IST)

    IND vs ENG : पहिलं सेशन समाप्त, लंच ब्रेकपूर्वी भारत 286/8

    दिवसाचं पहिलं सेशन संपल आहे. भारताकडू मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम फलंदाजी करत भारताचा एक चांगली आघाडी मिळवून दिली आहे. भारताचा स्कोर 286 वर 8 बाद असून भारताकडे सध्या 259 धावांची आघाडी आहे. शमी 52 तर बुमराह 30 धावांवर खेळत आहे.

  • 16 Aug 2021 05:26 PM (IST)

    IND vs ENG : षटकार ठोकत शमीचं अर्धशतक पूर्ण

    नवव्या विकेटसाठी उत्कृष्ट भागिदारी करत शमी आणि बुमराह मैदानात टिकून आहेत. शमीने एक चौकार आणि षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 16 Aug 2021 05:07 PM (IST)

    IND vs ENG : बुमराह शमीची अर्धशतकी भागिदारी

    बुमराह आणि शमी यांनी नवव्या विकेटसाठी खेळताना उत्तम अशी 50 धावांची भागिदारी पूर्ण केली आहे.

  • 16 Aug 2021 04:38 PM (IST)

    IND vs ENG : भारताकडे 200 धावांची आघाडी

    भारताचे संयमी खेळी करत 200 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या बुमराह आणि मोहम्मद शमी जोडी फलंदाजी करत आहे.

  • 16 Aug 2021 04:24 PM (IST)

    IND vs ENG : बुमराहचा कडक चौकार

    कसोटी सामना अतिशय रंगतदार स्थितीत आहे. भारताचे गोलंदाज फलंदाजी करत असून बुमराहने नुकताच वुडला एक चौकार ठोकला आहे.

  • 16 Aug 2021 04:08 PM (IST)

    IND vs ENG : इशांत शर्मा पायचीत

    भारताचा आठवा गडी इशांत शर्माच्या रुपात तंबूत परतला आहे. रॉबिनसनने त्याला पायचीत केलं आहे. आता फलंदाजीला जसप्रीत बुमराह आला आहे.

  • 16 Aug 2021 03:47 PM (IST)

    IND vs ENG : रॉबिनसनच्या चेंडूवर पंत बाद

    ऑली रॉबिनसनच्या चेंडूवर ऋषभची झेल यष्टीरक्षक जोस बटलरने पकडत भारताला मोठा झटका दिला आहे.

  • 16 Aug 2021 03:45 PM (IST)

    IND vs ENG : पंतचा अप्रतिम चौकार

    दिवसाची सुरुवात होताच तिसऱ्या ओव्हरमध्येच पंतने अँडरसनला दिवसाचा पहिला चौकार ठोकला आहे.

  • 16 Aug 2021 03:35 PM (IST)

    IND vs ENG : ऋषभ पंतवर सर्व मदार

    दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. सर्व महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याने सर्व मदार पंतवर आली आहे.

  • 16 Aug 2021 03:30 PM (IST)

    IND vs ENG : ऋषभ पंतसह इशांत शर्मा मैदानात, अँडरसनच्या हातात चेंडू

    पाचव्या आणि निर्णायक दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पंत आणि इशांत शर्माने फलंदाजीला सुरुवात केली आहे. तर जेम्स अँडरसनने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.

Published On - Aug 16,2021 3:29 PM

Follow us
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.